Beed Viral Video News  
महाराष्ट्र

Beed Video : बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल,कोर्टाच्या बाहेरच राडा

Beed Crime : बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. धारूरच्या न्यायालय परिसरात मारहाण झाली होती. पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये वाद झाला होता.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद

Beed Viral Video News : बीडचा बिहार झाला आहे का? असे म्हणायची वेळ आली आहे. कारण, कोर्टाच्या बाहेर जोरदार राडा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडच्या कायदा सुवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. दररोज मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजही बीडमधील मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

बीडमधील धारूरच्या न्यायालय परिसरात मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये जोरदार राडा झाल्याचा व्हिडीओ बीडमध्ये वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये दररोज नवनवीन हाणामारीचे व्हिडिओ सोशल माध्यमावरती व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हे व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का? बीडचा बिहार झाला आहे का? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. अशातच बीडच्या धारूर तालुक्यातील तालुका न्यायालयामध्ये जमिनीचे व्यवहारातून मारहाण झाल्याचे समोर आले आहे. धारूर येथील जिल्हा सत्र न्यायालय मध्ये ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. एका जमावाकडून मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे, या मारहाण प्रकरणी धारूर पोलिसांमध्ये सुमोटोनुसार सात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती धारूर पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT