Vinod Tawde News Saam TV
महाराष्ट्र

Vinod Tawde News: 'मिशन लोटस'वर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण; वेगवेगळ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Political News: अशा प्रकारचा कोणताही अहवात मी सादर केला नसल्याचा विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा कालपासून सुरु होत्या. मात्र अजित पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेते विनोद तावडेंच्या नावाचीही चर्चा होती. (Maharashtra Political News)

विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासंदर्भात आगामी लोकसभा निवडणुकीबाबत केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल सादर केल्याचं बोललं जात होतं. मात्र विनोद तावडे यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. अशा प्रकारचा कोणताही अहवात मी सादर केला नसल्याचा विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

विनोत तावडे यांनी ट्वीट करत म्हटलं की, दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे. (Breaking Marathi News)

आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसणार?

2019 च्या तुलनेत यावेळी भाजपच्या जागा घटणार. भाजपला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात फटका बसणार, असा अहवाल विनोद तावडे यांच्या समितीने दिला असल्याची चर्चा सुरू झाली होती. याच अहवालामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही नेते भाजपच्या टार्गेटवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. (Latest Marathi News)

अजित पवार यांचा खुलासा

दरम्यान भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत स्पष्टीकरण दिलं. जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. आपल्याबाबत केवळ गैरसमज पसरवण्यात आला असून आपण ४० आमदारांच्या सह्या घेतल्याच्याही अफवा असल्याचं अजित पवारांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी सामनातल्या अग्रलेखावरून संजय राऊत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांचेही कान टोचले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT