Raj Thackeray
Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

'राज ठाकरेंनी भाजपकडून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवायची सुपारी घेतलेय'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे -

सिंधुदुर्ग : राज ठाकरेंनी (Raj Thackray) मशिदींवरील भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टीमेटमवर शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. 'राज ठाकरे यांनी भाजपच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याची आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवायची सुपारी घेतली आहे. म्हणूनच हे प्रकार सुरु असल्याचं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

ते पुढे म्हणाले, राज ठाकरे यांना माझी विनंती आहे तुम्ही भोंग्याचा जो विषय हाती घेतलाय, ज्या पक्षाच्या वतीने तुम्ही अप्रत्यक्ष बाजू मांडताय, त्याचं पक्षाचं राज्य देशात आहे त्यामुळे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) जाऊन भेटा आणि भोंगे उतरवायचेच झाले तर अख्या देशातलेचं उतरवा ना, फक्त महाराष्ट्रातलेच कशाला? पंतप्रधानांना सांगा आणि संपुर्ण देशासाठी तो कायदा करा. केवळ नी केवळ महाराष्ट्र सरकारला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी हे सुरू केलेलं कुंभांड असल्याची टीकाही राऊत यांनी राज ठाकरेंवर केली.

हे देखील पहा -

यावेळी त्यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्यावरतीही टीका केली, राज ठाकरे आता अयोध्येला जाण्याची हे जे नौटंकी करतायत मात्र खऱ्या अर्थाने अयोध्येला जावून राम मंदिराचा पुकार करण्याची गरज होती तेव्हा हे घरी बसले होते. त्यावेळेस हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राम मंदीर (Ram Mandir) होत असताना त्या ठीकाणी जाण्याचं जे प्रयोजन आहे ते त्यांचं त्यांनाच लखलाभ होओ आम्हाला त्याचं काही देणघेणं नाही. त्यामुळे आम्ही काही त्यांच्या दौऱ्याला आडकाठी आणणार नाही असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat Lok Sabha Voting LIVE: नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केलं मतदान, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

Ahmednagar News: मोठी बातमी! अहमदनगरमध्ये 'वंचित'च्या उमेदवाराच्या कारवर दगडफेक; परिसरात मोठी खळबळ

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT