Vinayak Mete accident case saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete accident case: मेटेंचे चालक समाधान वाघमारेंचा मोठा खुलासा; म्हणाले,' 3 ऑगस्ट रोजी आम्ही...'

चालक समाधान वाघमारे यांनी नवा खुलासा केला आहे. 'शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली आहे.

विनोद जिरे

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताला नवे वळण लागलं आहे. विनायक मेटे (Vinayak Mete) अपघात प्रकरणात मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या आरोपानंतर मेटे यांचे दुसरे चालक समाधान वाघमारे यांनी मोठा खुलासा केला आहे. 'शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली आहे. (Vinayak Mete accident case)

समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. मात्र ,14 तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते. समाधान वाघमारे म्हणाले की , 3 ऑगस्ट रोजी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. या दरम्यान मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का ? मात्र साहेब म्हणाले ते दारू प्यायले असतील, त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त ८० च्या स्पीडवर होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता'.

'जर त्या दिवशी मी गाडीवर असतो तर, मी स्वतःचा जीव दिला असता. मात्र, साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं. मला वाटतं शिक्रापूरच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यामध्ये बरंच काही मिळू शकतं, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांचे चालक समाधान वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघाताला वेगळे वळण लागलं आहे. त्यामुळे नवनवीन खुलासे आणि माहिती समोर येत असल्याने संशयाचे ढग अधिकच दाट होत असल्याचा चित्र निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील गंज पेठ परिसरामध्ये दहीहंडीचे बॅनर रस्त्यावर कोसळले

Acicdent News : मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! भरधाव ट्रकने ७ वाहनांना उडवले, ३ जणांचा मृत्यू, १० गंभीर

Cumin water: सलग 7 दिवस प्या जिऱ्याचं पाणी; होणारे फायदे पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Cholesterol control: औषधं सोडा! तुमच्या दररोजच्या या 5 सवयींमुळे मेणासारखं वितळेल कोलेस्ट्रॉल

मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस; 'या' १० अटींनुसार उपोषणाला परवानगी, जरांगेंकडून प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT