vinay kore Saam tv
महाराष्ट्र

Sugar Factory Election: 'विधान परिषद घ्या आणि...';माजी मंत्री विनय कोरे यांनी सतेज पाटील यांचं थेट नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट

Vinay kore News: विधान परिषद घ्या आणि राजाराम सहकारी साखर कारखाना महाडिक यांच्यासाठी सोडा असा शब्द मी सतेज पाटील यांच्याकडून घेतला होता, असा गौप्यस्फोट विनय कोरे यांनी केला आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर

Kolhapur News: विधान परिषद घ्या आणि राजाराम सहकारी साखर कारखाना महाडिक यांच्यासाठी सोडा असा शब्द मी सतेज पाटील यांच्याकडून घेतला होता. मात्र सतेज पाटील यांनी हा शब्द पाळला नाही, असा गौप्यस्फोट माजी मंत्री आणि जनसुराज्य पक्ष पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी केला आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. (Latest Marathi News)

राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत महादेवराव महाडिक , अमल महाडिक यांच्या विरोधात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पॅनल उभे केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज इथं महादेवराव महाडिक यांच्या पॅनलची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी मंत्री आणि जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी सतेज पाटील यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप केला.

कोरे म्हणाले, मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून सतेज पाटील तर भाजपकडून अमल महाडिक यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊ नये आणि पैशाचा अपव्य होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यामुळे मी मुंबईतील माझ्या घरामध्ये एक मीटिंग आम्ही घेतली. या मीटिंग ला चंद्रकांत दादा पाटील , संजय पाटील, सतेज पाटील होते. यावेळी हा विषय घेऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन जाऊ असेही म्हणाले.

'देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जायचं तर केवळ कोल्हापूरची जागा असं न होता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या जागा किती निवडून येणार आणि काँग्रेसच्या जागा किती निवडून येणार यावर चर्चा होणार होती. त्या चर्चेमध्ये अमरीश पटेल यांची आणि नागपूर मधील जागा भारतीय जनता पार्टीसाठी सोडाव्या आणि कोल्हापूरची जागा ही भारतीय जनता पार्टीने काँग्रेससाठी सोडावी अशी चर्चा झाली, असे ते म्हणाले.

'त्यावेळी महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांच्या ईरशेमुळे निवडणुकीत होणाऱ्या खर्चामध्ये एखादा नवीन कारखाना उभारता येईल इतका खर्च होणार होता. त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी सतेज पाटलांनी विधानपरिषद घ्यावी आणि महादेवराव महाडिक यांच्यासाठी राजाराम सहकारी साखर कारखाना सोडावा अशी चर्चा झाली होती, असे कोरे म्हणाले.

'आता या निवडणुकीत ज्या ज्या वेळी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या चर्चा झाल्या यावेळी मी सतेज पाटील यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही शब्द दिलेला आहे. तुम्हाला फार मोठे क्रेडिट मिळालेला आहे. देशात काँग्रेसचा बिनविरोध आमदार होण्याचा नावलौकिक तुम्हाला मिळालेला आहे. एवढ मोठेपण जर या सगळ्या गोष्टीतून मिळाला असेल तर तुम्ही दिलेला शब्द या ठिकाणी पाळा. मी जी मध्यस्थी केली, माझ्या मध्यस्थीला मान दिला गेला नाही आणि माझ्यासमोर दिलेला शब्द सतेज पाटील यांनी पाळसल गेला नाही, असा आरोप विनय कोरे यांनी केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT