Nanded News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News: नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात विद्यार्थी अडकले, जीव धोक्यात घालून नागरिकांनी असं वाचवलं; थरारक VIDEO

Villagers Saved Students From Flood Water: नांदेड जिल्ह्यात गावकऱ्यांनी मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून वाचवलं. ही घटना खैरगाव येथे घडलीय.

Rohini Gudaghe

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही नांदेड

नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून वाचवल्याची घटना समोर आलीय. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आल्याचं समोर आलंय. याच पुराच्या विळख्यात काही शाळकरी विद्यार्थी अडकले होते. या विद्यार्थ्यांना मानवी साखळी करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलंय.

नक्की काय घडलं?

नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस (Villagers Saved Students From Flood Water) पडतोय. या पावसामुळे काही नदी नाल्यांना पूर देखील आलाय. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील नाल्याला पूर आला होता. नाल्याच्या पलीकडे विद्यार्थी अडकले होते. त्यांना मानवी साखळी करून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. १६ जूलै राजी सायंकाळी हा सर्व प्रकार घडला. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. विद्यार्थ्यांना पुरातून वाचवताना व्हिडिओ समोर (Nanded Rain) आलाय.

विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून वाचवल्याची घटना

नेहमीप्रमाणे हे सर्व विद्यार्थी शाळेत गेले होते. सायंकाळी त्यांची शाळा सुटली अन् हे विद्यार्थी घराकडे निघाले. खैरगावकडे जात असताना अचानक या नाल्याला पूर आला. त्यामुळे विद्यार्थी पुरात (Nanded News) अडकले. गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालत या विद्यार्थ्यांना वाचवलं. नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे पुरात अडकलेले विद्यार्थ्यांची मदत गावकऱ्यांनी केल्याचं समोर आलंय. हे सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती मिळतेय.

विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न

गावकऱ्यांनी भरपावसामध्ये या विद्यार्थ्यांची मदत केलीय. डोक्यावर पाणी कोसळत असताना गुडघाभर पाण्यात गावकरी उभे राहिले. हातांची साखळी करत गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर (Flood Water) काढलं. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. या रस्त्यावरच्या पुलाची उंची वाढवावी, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी आहे. परंतु, या पुलाची उंची वाढविली नसल्याने पावसाळ्यात नाल्याला पूर येतो, त्यामुळे गावकऱ्यांना अशा पध्दतीने मानवी साखळी करून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT