Villagers Morcha At Pedgaon Gram Panchayat For Regular Water Supply Saam Digital
महाराष्ट्र

Parbhani Water Crisis News: चिंताजनक! हंडाभर पाण्यासाठी माेजावे लागताहेत पैसे, पेडगावकरांचा ग्रामपंचायतीवर माेर्चा

Maharashtra Water Crisis News: पेडगावात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते करु लागले आहेत. टॅंकरने पाणी पूरवठा व्हावा यासाठी ग्रामस्थ देखील आज आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

राजेश काटकर

परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे बहुतांश गावात प्रशासनाच्या वतीने टॅंकरने पाणी पूरवठा केला जात आहे. दरम्यान पेडगाव ग्रामस्थांनी आज (साेमवार) सुरळीत पाणी पूरवठ्यासाठी पेडगाव ग्रामपंचायतीवर माेर्चा काढला.

परभणी तालुक्यातील पेडगावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते करु लागले आहेत. टॅंकरने पाणी पूरवठा व्हावा यासाठी ग्रामस्थ देखील आज आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

ग्रामस्थांनी थेट पेडगाव ग्रामपंचायतीवर माेर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी पाणी आमच्या हक्काचं अशा घाेषणा देत परिसरा दणाणून साेडला. यावेळी ग्रामस्थ म्हणाले गावात दुष्काळी स्थिती असताना देखील ग्रामपंचायत पाण्यासाठी काही उपयायाेजना करीत नाही. ग्रामपंचायतीने टॅंकरने पाणी पूरवठा करावा अऩ्यथा आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान ग्रामसेवकाने आंदाेलकांना दिलेल्या उत्तरामुळे ग्रामस्थ चिडले. त्यांनी आणखी किती वर्ष पाण्यासाठी गावक-यांना झगडावे लागणार असा सवाल ग्रामस्थांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...अन् एकनाथ शिंदे सुसाट धावत सुटले; उपमुख्यमंत्र्यांचा मॅरेथॉनचा व्हिडिओ व्हायरल

ITR Filling 2025: पहिल्यांदा आयटीआर भरताय? नो टेन्शन, स्टेप बाय स्टेट प्रोसेस जाणून घ्या, आयकर विभागाने जारी केला व्हिडिओ

Bapu Aandhle Case : सरपंच हत्या प्रकरणाच्या आरोपीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, बीडमध्ये पुन्हा वातावरण तापले

Good News: सोलापूर- अहिल्यानगर आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पाण्याची चिंता मिटली; उजणी धरण १०० टक्के भरलं

समृद्धी महामार्गावर नियम धाब्यावर, दुचाकीवर तरुणाचा बिनधास्त प्रवास, व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT