villagers from shivtar and buldhana afraid of leopard Saam Digital
महाराष्ट्र

Leopard : शिवथर परिसरात बिबट्याचा वावर, कव्हळामध्ये शेळ्यांचा फडशा; ग्रामस्थ भयभीत

Leopard Latest Marathi News : शिवथर हद्दीत रात्रीच्या वेळी शेतामध्ये कोणीही जाऊ नये असे आवाहन सातारा जिल्हा वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

ओंकार कदम / संजय जाधव

Leopard News :

सातारा (satara) आणि बुलढाणा (buldhana) येथे शेतात बिबट्याचा वावर आढळल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाला बिबट्याची (leopard) माहिती दिली. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी उपाययाेजना केल्या जातील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यातील शिवथर गावच्या हद्दीत धनगर वस्तीत अचानक एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला. शिवथर परिसरात बिबट्या आल्याने गावातील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी बिबट्या हाेता त्याला तेथून हुसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या झाडावर चढला. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याची माहिती वनविभागाला दिली. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली असता बिबट्याने झाडावरून पुन्हा शेतात धूम ठोकली. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कव्हळा येथे बिबट्याकडून शेळ्यांचा फडशा

बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील कव्हळा येथील शेतकरी राजेंद्र महाले यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपल्या शेतात शेळी पालन सुरू केला. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांच्या गोठ्यात शिरून लहान मोठ्या सात बकऱ्यांचा फडशा पाडला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे पशुपालक शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ आर्थिक स्वरुपात मिळावी अशी मागणी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT