vinayak raut 
महाराष्ट्र

रिफायनरीचा निर्णय आठवड्यात लागेल; समर्थकांसह विराेधकांना आशा

अमोल कलये

रत्नागिरी : रिफायनरीचा प्रकल्प refinery project हा राजापूर येथेच व्हावा यासाठी रिफायनरीला समर्थन देणारे एकवटले आहेत. या सर्मथकांनी खासदार विनायक राऊत vinayak raut यांची भेट त्यांना रिफायनरी संदर्भात आग्रही भुमिका घ्यावी अशी मागणी केली. खासदार राऊत यांनीही आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करु असे आश्वासन समर्थन करणा-यांना दिले आहे.

रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थन आणि त्यास विराेध करणारे त्यांच्या भुमिका सातत्याने लाेकप्रतिनिधींपर्यंत पाेहचवत आहेत. शनिवारी बारसू ,सोलगाव, नाटे दशक्रोशीतील आंबा बागायतदार, मच्छिमार, रिफायनरी समर्थकांनी खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली. राजापूरमध्ये कोणताही प्रकल्प नाही. आरोग्य, रस्ते, रोजगार, शैक्षणिक अशा सुविधांची वानवा आहे जर रिफायनरी प्रकल्प इथे उभारला गेला तर रोजगार उपलब्ध होईल.

या भागाचा विकास होईल त्यासाठी रिफायनरी आवश्यक असल्याचे मत समर्थकांनी खासदार राऊत यांच्याकडे मांडली. याबराेबरच बारसू , सोलगाव ,नाटे या परिसरात विस्थापन कमी होईल. या परिसरात एमआयडीसीची प्रस्ताव देखील आहे. त्यामुळे या ठिकाणी रिफायनरी व्हावी अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे निवदेन रिफायनरीला समर्थन करणा-यांनी खासदार विनायक राऊत यांना दिले.

दरम्यान रिफायनरीला समर्थन देणा-यांना आणि विरोध करणा-यांनी निवेदन दिले आहे. या दाेघांचे बाजू पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर ठेवल्या जातील. ज्या बाजूने बहुमत असेल त्या बाजूचा विचार केला जाईल असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे. बारसू सोलगावात रिफायनरी व्हावी यासाठीचा निवेदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचवण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.

खासदार विनायक राऊत यांनी समर्थन करणा-यांना येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करीन अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काेर्टात जाणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रिफायनरीचा निर्णय कदाचित या आठवड्यात लागेल अशी समर्थन करणा-यांसह विराेधी गटास वाटू लागली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT