पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी
नागपूर : शरद पवारांनी आगामी काळात प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांनी विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. यावर काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काँग्रेस उद्या मजबूत व्हावी, तर देश मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते नागपुरात बोलत होते.
शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना आगामी काळात अनेक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. याबाबत काँग्रेस वर्तुळातही चर्चा सुरु झाली आहे.
यावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, 'शरद पवार मोठे नेते आहेत, हायकमांडकडे काय चर्चा होते, त्या संदर्भात मला माहीत नाही. शरद पवारांचा जन्मच काँग्रेस आहे. गांधी विचारधारा आहे. ते त्याच तालमीतच तयार झाले आहेत. यशवंतराव चव्हाणांपासून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली, त्यामुळे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. उद्या काँग्रेस मजबूत व्हावी, तर देश मजबूत होईल'.
'शरद पवार मूळ गांधी विचारांचे आहेत, गांधी विचार कोणी संपवू शकत नाहीत. काही जणांचे पक्ष हे अवकाळी पावसासारखे आहेत. अवकाळी पाऊस जन माणसाला उद्धवस्त करून जातो, आताच्या सत्ताधारी पक्षाची स्थिती आहे. काँग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे. ज्या विचारांनी हा पक्ष उभा झालेला आहे. तो विचार देशातील जात-पात धर्म पंथ गाळून मानवतेचा विचार म्हणून सर्व जाती धर्माच्या सन्मान, सर्वांना न्यायाने हक्क देणारा काँग्रेस पक्ष आहे, असे ते पुढे म्हणाले.
'राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत विकास हा अजेंडा राहिलेला आहे. -आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत, जनता पूर्ण देश बदलण्याची तयारी करून बसलेला आहे. काँग्रेसच्या मागे जनता उभी असल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. हुकूमशाही प्रवृत्तीला जनता विटलेली असल्याने ते म्हणत आहेत. पवारांसारखे मोठे नेते बोलतात, त्यावेळी त्यांना फार दूरच अभ्यास करून त्यांना दूरदृष्टी आहे,असे वडेट्टीवार पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.