Samruddhi Mahamarg Accident Saam TV
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: समृद्धी महामार्गावरील मृतांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत द्या; विजय वडेट्टीवर यांची मागणी

Vijay Wadettiwar on Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबांना २५ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली.

Satish Daud

Vijay Wadettiwar on Samruddhi Mahamarg

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबांना २५ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. वडेट्टीवार यांनी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या अनुषंगाने विषय उपस्थित केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सभागृहात बोलताना वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, १ जुलै २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर भयावह अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.

मात्र प्रत्यक्षात मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडील २ लाख रुपये आणि राज्य सरकारचे ५ लाख रुपये असे केवळ ७ लाख रुपयेच देण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या वेदना समजून घेतल्या डोळ्यात पाणी आलं, अशी खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) २५ जणाचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये मदतीची घोषणा करत असाल आणि फक्त ७ लाख रुपये मिळत असतील तर त्याचा उपयोग काय? असा संतप्त सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर समृद्धी महामार्गावरील मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने २५ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी सुद्धा विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या मागणीवर काय निर्णय घेणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli politics : आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी एकनाथ शिंदे टाकणार डाव; वरळीत उतरवणार तगडा उमेदवार

Ratan Tata's Will: रतन टाटांची इच्छा, शांतनू नायडू आणि डॉग टिटोसाठी सोडली कोट्यवधींची संपत्ती; मृत्यूपत्रात काय लिहिलं? वाचा...

Maharashtra News Live Updates: शिवसेना शिंदे ८० जागा लढण्याची शक्यता

Red Pumpkin Benefits: लाल भोपळा खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे!

Navneet Rana : 'बच्चू कडू करोडोंचा मालक झाला', नवनीत राणा यांचं वक्तव्य; कडू विरुद्व तायडे सामना रंगणार

SCROLL FOR NEXT