नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी
उपमुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. उद्धव ठाकरेंना संपविण्यासाठी एकनाथ शिंदेंना पुढे आणले. आता आता शिंदेंना संपविण्यासाठी नवा ‘उदय’ पुढे येईल. ही स्थिती महाराष्ट्रात येऊ शकते”, असं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. यावर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पलटवार केलाय.
विजय वडेवट्टीवार हे स्वता:चा प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे घेऊन गेले होते. कुणामार्फत कोन गेला कोणाशी चर्चा झाली याची माहिती आहे. मी राजकारणाचे एथिक्स पाळतो म्हणत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी वडेवट्टीवार यांच्यावर शरसंधान साधलंय. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी उदय सामंत हे नवे उपमुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली होती.
एक उदय दोन दगडांवर हात ठेवून आहे, त्याचा 'उदय' होण्याची शक्यता आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. यावर उबाठा खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील सामंत यांच्याबाबत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावर आज शिवसेना नेते उदय सामंत यांनी उत्तर दिलंय. विजय वडेवट्टीवार यांनी स्वत:चा प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे आणला होता. त्यामुळे त्यांना असं वाटत असावं की, उदय सामंत आडकाठी ठरत आहेत.
मग कोणाची बदनामी करायची, तर उदय सामंत यांची बदनामी करायची, त्यामुळे ते असं म्हणाले. पण कोणामार्फत कोण गेलं होतं. कोणाला फोन गेला होता. याबाबत माझ्याकडे जितकी माहिती आहे, तितकी माहिती कोणाकडे नसेल. पण मी पॉलिक्टीकल एथिक्स पाळतो, काही बंधनं पाळतो. यामुळे झालेल्या गोष्टी मी सोडून देतो. पण आपल्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वत:चा अस्त झालाय.
ज्याच स्वतःच हसू झालं आहे त्यांनी स्वतःचा उदय करुन घेवू नये. त्यामुळे त्यांच राजकारण त्यांच्यापूरतं आणि राऊत साहेबांचं राजकारण त्यांच्यापुरतं तर माझ राजकारण माझ्यापुरतं, असं सामंत म्हणालेत. संजय राऊत यांनीही सामंत यांच्याविषयी भाष्य केलं होतं. त्यावरही उदय सामंत यांनी उत्तर दिलंय. सामंत यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विजय वडेवट्टीवार यांच्या आरोपांवर नवी प्रश्न उपस्थित होत आहेत. सामंत यांनी केलेल्या दाव्यावर वडेवट्टीवार काय भूमिका मांडतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.