Vijay Wadettiwar criticized eknath shinde devendra fadnavis ajit pawar On Jalna Lathi Charge Saam TV
महाराष्ट्र

Jalna Lathicharge: लाठीचार्जचे आदेश देणारा कोण? सर्वांची नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल; वडेट्टीवारांचं मोठं विधान

Satish Daud

Vijay Wadettiwar On Jalna Lathi Charge: जालन्यातील अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. या लाठीमाराचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून यावरून राज्याचं राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्याचे आदेश देणारा कोण? असं म्हणत सत्ताधाऱ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल, असं मोठं विधान विधासभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांसोबत संवाद साधला, यावेळी जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जालन्यात पोलिसांनी केलेली लाठीमाराची कारवाई कुणाच्या आदेशाने झाली? SP दोषी आणि DYSP मोकाट कसे? त्यांच्यावर अजून कारवाई का झाली नाही? असे अनेक सवाल उपस्थित केले.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, यासाठी मराठा समाजाला आनंद आहे का? हे ते ठरवतील, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावार लवकर तोडगा काढावा, त्याचबरोबर ओबीसीचा आरक्षण वाढवून द्यावे, आंदोलनस्थळी जाऊन मी हेच बोललो, ओबीसी समाजाची जी भूमिका आहे, तीच माझी देखील आहे, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत मराठा आंदोलकांची माफी मागितली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. या घटनेचं राजकारण होणं योग्य नाही. काही नेत्यांनी तो प्रयत्न केला. लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून आले, असे चुकीचे वातावरण निर्माण करण्यात आले, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.

यावर बोलताना लाठीहल्ल्याचे आदेश देणारा कोण? असं म्हणत सत्ताधाऱ्यांची नार्को टेस्ट करा, सत्य समोर येईल, असं मोठं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली असून यावरून राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT