Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Saam Tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: मरेपर्यंत आम्ही महाज्योती बंद होऊ देणार नाही, वडेट्टीवारांचं फडणवीसांना उत्तर

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: मरेपर्यंत आम्ही महाज्योती बंद होऊ देणार नाही. उलट यंदा आम्ही महाज्योतीचे बजेट वाढवून घेणार असल्याची माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार महाज्योती बंद पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देत वडेट्टीवारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे (Vijay Wadettiwar Answer To Devendra Fadnavis About Mahajyoti).

एका बाजुला महाज्योतीसाठीची आर्थिक तरतूद दिली जात नाहीये. तर दुसऱ्या बाजुला ओबीसी मंत्री आंदोलन करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. त्यानंतर बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही फडणवीसांचे आभार मानतो, त्यांच्यामुळे महाज्योती बद्दल स्पष्टीकरण देण्याची संधी मिळाली.

ओबीसी विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशीप मिळत आहे, ती विलासराव देशमुख यांनी सुरू केली होती. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशीप काँग्रेसची पुण्याई आहे, असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. महाज्योतीसाठी जो निधी अर्थसंकल्पात जाहीर झाला होता तो सर्व मिळाला, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

काहीही झाले तरी आम्ही महाज्योती (Mahajyoti) बंद होऊ देणार नाही. फडणवीस यांच्या मनात काही वेगळे असेल तर सांगता येत नाही, अशी कोपरखळी ही वडेट्टीवार यांनी लगावली. महाज्योतीचे पुणे, नाशिक औरंगाबादमध्ये कार्यालय सुरु केले जाणार आहे. तसेच 72 नवे वसतिगृह तयार करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

पीएचडीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे पैसे थकीत नाही. फक्त भाजपने चिथावणी दिलेल्या काही मुलांनी आम्हाला 31 हजार स्टायपेंड पाहिजे असा आग्रह धरून स्टायपेंड घेतलेला नाही. आम्ही फडणवीस यांच्या काळातील कागदावर महाज्योती प्रत्यक्षात आणली. आज महाज्योतीच्या माध्यमातून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी मुलांना पाठविल्याचा दावा ही वडेट्टीवार यांनी केलाय.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, अशी मविआ सरकारची भूमिका

ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, अशी माझी आणि महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणासह येणाऱ्या काळात निवडणुका व्हाव्यात अशी आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमच्याकडून अपेक्षा धरली होती. त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आमच्या सरकारकडून झालेलं आहे. उलट मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेत या संदर्भात मागे पडलाय.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

Kalyan News: बहिणीचा ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह; भाऊ संतापला, रागाच्या भरात केलं भयानक कांड

Gulkand Recipe: गुलकंद कसं बनवायचं? एकदम सोपी रेसिपी

GT vs RCB,IPL 2024: गुजरातच्या संघात स्टार फलंदाजाचं होणार कमबॅक; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Tulsi Vastu Tips: तुळशीला सकाळी 'या' वेळी घाला पाणी; होईल आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT