Vidya Vetan Yojana Saam Digital
महाराष्ट्र

Vidya Vetan Yojana : लाडक्या भावासांसाठी खुशखबर! शासकीय कार्यालयांमध्ये मिळणार इंटर्नशीपची संधी, कुठे आणि कसा कराल अर्ज?

Vidya Vetan Yojana : मंजूर पदाच्या कमीत कमी ५ टक्के आणि किमान एका उमेदवाराला लाडका भाऊ योजनेंतर्गत शासकीय कार्यालयात इंटर्नशीपची संधी देण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Sandeep Gawade

मंजूर पदाच्या कमीत कमी ५ टक्के आणि किमान एका उमेदवाराला लाडका भाऊ योजनेंतर्गत प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन आणि प्रत्येक शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी देण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यात पात्र महिलांना देखील संधी मिळणार आहे. त्यामुळे उद्योग, कौशल्य विकास यांच्यासह सहकार, उच्च व तंत्रशिक्षण, सहकार, बंदर विकास, परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ही उद्योगांनाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी ही मोठी संधी आहे. उमेदवाराला चांगला अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार ६००० रुपये, ८००० रुपये आणि १०००० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. उद्योगांसह, सहकारी बँका, कृषी सहकारी पतसंस्था याठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिणार्थींना संधी मिळणार आहे. त्यासाठी अशा रिक्त पदांची यादी करून, त्या-त्या जिल्ह्यांमध्ये प्रशिणार्थींना लगेच संधी उपलब्ध करून देता येणार आहे.

यासाठी ऑनलाईन तसेच ऑफ लाईन या दोन्ही पद्धतींने नोंदणी करण्यात यावी. जिल्हा रोजगार कार्यालये, जिल्हा उद्योग केंद्र आदींनी विशेष बाब म्हणून प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र यांपासून ते सिडको, एमएसआरडीसी यांच्यासारख्या स्वतंत्र प्राधिकरणांपासून ते सर्वच ठिकाणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना संधी देता येणार आहे. त्यासाठी या सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT