Maharashtra Weather Heatwave Alert News  Saam Tv
महाराष्ट्र

Heatwave Alert : विदर्भासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! तापमानाचा पारा ५०शी जवळ, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Weather Heatwave Alert News : विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून ब्रह्मपुरी येथे ४७.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत.

Alisha Khedekar

  • ब्रह्मपुरी येथे ४७.६ अंश तापमानाची नोंद

  • अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

  • नागपुरात मोबाईलवर उष्णतेबाबत हाय अलर्ट संदेश

  • पुढील २४ तास महत्त्वाचे

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील हंगामातील सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील २४ तासांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील (Vidrbha Heatwave Alert ) अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला असून नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Weather Orange Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील नागरिकांना उष्णतेचा आणखी मोठा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागपुरात (Nagpur 24 Hours Alert) नागरिकांच्या मोबाईलवर मंत्रालय मुंबईकडून सलग दुसऱ्या दिवशी हाय अलर्ट संदेश पाठविण्यात आला. अचानक मोबाईलवर मोठ्या आवाजात टोन वाजून स्क्रीनवर उष्णतेबाबतचा मेसेज झळकल्याने अनेक नागरिक घाबरले. काहींनी हा आपत्कालीन इशारा पाहून भीतीही व्यक्त केली. या मेसेजमध्ये पुढील २४ तासांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने नागरिकांना शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, सैल आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाला मिळणार नवा 'हेड कोच'; इंग्लंड मालिकेनंतर संघात होणार मोठा बदल, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra News Live Update: -नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात सर्वच लहान-मोठ्या नद्यांना मोठा पूर

Monsoon Tips : पावसाळ्यात डासांना पळवून लावतील 'हे' घरगुती उपाय, फक्त २ मिनिटांत मच्छर गायब

पावसाळ्यात ओले केस सुकवण्यासाठी दररोज हेअर ड्रायर वापरताय तर होऊ शकते केसांचे नुकसान; कशी घ्याल काळजी?|Hair Dryer Uses

Loose Motion : पावसाळ्यात 'या' ३ चुका टाळा; नाहीतर जुलाब, अपचन अन् पोटाच्या आजारांचा धोका वाढेल

SCROLL FOR NEXT