Akola Politics News  Saam TV
महाराष्ट्र

Akola Politics News : सलग ३० वर्षे पराभव, काँग्रेसने हट्ट सोडावा; अकोल्यात जागेवरुन काँग्रेस-ठाकरे गटात जुंपली

Ruchika Jadhav

अकोला : राज्यात सध्या आचारसंहिता सुरू आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी विविध जिल्ह्यांत विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. तारखा जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ सुरू आहे. अशीच काहीशी परिस्थिती अकोला जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे.

विदर्भातील काही जागांवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात निर्माण झालेला वाद विकोपाला गेल्याच समजत आहे. सध्यातरी दोघांपैकी कुणीही दोन पावले मागे घेण्यास तयार असल्याचे दिसत नाहीये. हिच परिस्थिती आता अकोला पश्चिम मतदारसंघात मविआमध्ये दिसत आहे. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने अकोला पश्चिम मतदारसंघावर दावा केलाय.

दरम्यान, अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये गेली 30 वर्ष सातत्याने काँग्रेसचा पराभव होत, भाजपाचा उमेदवार इथं विजयी होत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा असणार, असं स्पष्ट मत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रकाश डवले यांनी व्यक्त केलं आहे.

मतदारसंघातील पराभव पाहता काँग्रेसने आपला हट्ट सोडावा आणि एक पाऊल मागे घ्यावं, असं आवाहनही डवले यांनी केलंय. विकास न झाल्याने मतदारांमध्ये रोष आहे. सामान्य जनता, युवक, युवती, विविध समाजीक संघटनांसोबत नाळ जोडलेला नेता म्हणून आपण स्वतः या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे ते म्हटले. मागील काही दिवसांपासून डवले हे मुंबईत तळ ठोकून आहेत.

अकोला पश्चिम या मतदारसंघात काँग्रेसने दावा केलाय, काँग्रेसच्या दाव्यानंतर अकोल्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पोस्टर वार मिळाला होता. मागील तीस वर्षापासून काँग्रेसचा पराभव होतोय, येथील जनता पुन्हा काँग्रेसला संधी देणार का? असा सवाल ठाकरे गटाने बॅनर बाजीतून उपस्थित केला होता.

मविआमधून कोण आहे मतदारसंघासाठी इच्छुक?

मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अकोला पश्चिम या जागेवरून मोठा वाद आहे. ही जागा आपल्याकडे राहावी, असा आग्रह ठाकरे गट धरून आहे. ठाकरे गटातून शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मिश्रा, शिवसनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश डवले आणि इतर. तर काँग्रेसकडून मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, जिशान हुसेन, रमाकांत खेतान, लोकसभेतील पराभूत उमेदवार डॉ.अभय पाटील आणि इतर शर्यतीत आहेत.

मात्र शरद पवार गटाकडून कोणीही नाहीये. त्यामुळे मविआमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघ कोणाच्या वाटेवर जातोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, 2593 फरकाच्या मतांनी याच मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांचा पराभव झाला होता आणि भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा हे विजयी झाले होते.

अकोला पश्चिम मतदारसंघात 2019 प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :

भाजपाचे गोवर्धन शर्मा 2593 मतांनी विजयी झाले.

उमेदवार गोवर्धन शर्मा, पक्ष - भाजप, मिळालेली मते 73262

उमेदवार साजिदखान पठाण, पक्ष - काँग्रेस, मिळालेली मते 70669      

उमेदवार मदन भरगड, पक्ष - वंचित , मिळालेली मते 20687

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Bachchan-Aishwarya Rai: अभिषेकने ऐश्वर्याला केलेल्या प्रपोजचा किस्सा, खोटी अंगठी देत प्रेमाची कबुली

IND vs NZ 2nd Test: दुसऱ्या कसोटीचा निकाल ३ दिवसात लागणार? खेळपट्टी कोणाला देणार साथ ; पाहा पिच रिपोर्ट

Dhokla Recipe: पेला ढोकळा खाल्ला का? असा बनवा ग्लास खमंग ढोकळा, पाहा खास रेसिपी

Diwali Special Saree : खास दिवाळीसाठी अशी साडी ट्राय करा; तुम्हीच सगळ्यात सुंदर दिसाल

Maharashtra News Live Updates: दिवाळीत धावणार पुणे ते नागपूर शिवनेरी बस

SCROLL FOR NEXT