Maval Assembly Election: मावळवरुन महायुतीत महाभारत! सुनिल शेळकेंविरोधात भाजप नेत्यांचे बंड, शरद पवारांना साथ देण्याची तयारी?

Maharashtra Assembly Election 2024: उमेदवाराची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
Maval Assembly Election 2024
Maval Assembly Constituency Saam Tv
Published On

Maval Assembly Election 2024: मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात आता भाजप नेत्यांनीच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कारण बापू भेगडे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे रवींद्र भेगडे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, मी लढणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मावळमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

Maval Assembly Election 2024
Junnar Assembly: शरद पवारांचा मोठा डाव! अतुल बेनकेंविरोधात 'तगडा' उमेदवार शोधला; जुन्नरमध्ये घड्याळ विरुद्ध 'तुतारी' सामना ठरला

मावळवरुन महायुतीत वाद!

अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या अडचण वाढताना दिसत आहेत. कारण बापू भेगडे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे रवींद्र भेगडे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. रवींद्र भेगडे यांनी भारतीय जनता पार्टीने दिलेल समन्वयक पदही नाकारले आहे. तसेच आम्ही निवडणूक लढणार आहे. उमेदवाराची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

मावळ विधानसभेसाठी आमचा प्रचार सुरू आहे. आमची सर्व तयारी झालेली आहे. इथली जनता त्रासलेली आहे. महायुतीपेक्षा आम्हाला तालुका प्रिय आहे. पाच वर्षातील राजकारण आहे. ते जनतेला नकोय. मावळ विधानसभेत परिवर्तन अटळ आहे. मावळ विधानसभेत आमचं ठरलं आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होऊ द्या. मावळमध्ये परिवर्तन अटळ आहे, असेही रवींद्र भेगडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मावळात महायुतीमध्येच संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Maval Assembly Election 2024
Maharashtra Politics: मविआच्या नाराजीनाट्यावर पडदा! काँग्रेसचा 'हा' नेता वाद मिटवणार, शरद पवार- ठाकरेंशी चर्चा करणार

सुनिल शेळकेंनी घेतली फडणवीसांची भेट!

दरम्यान, मावळचे भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केली होती. मात्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने बाळा भेगडे यांनी मुंबईत भेट घेतली. मावळमध्ये काही दिवसांपूर्वी शरद पवारांचा पाठिंबा घेऊन पुरस्कृत उमेदवार देण्यात येणार आणि त्या उमेदवाराच काम भाजप करणार असा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ज्या काही चर्चा होत्या. शरद पवारांचा पाठिंबा घेऊन पुरस्कृत उमेदवार देणार, यावर आज बाळा भेगडे यांनी स्पष्ट सांगितल्याने अनेक गोष्टींवर पांघरून पडलं आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Maval Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election : राज्यात रणधुमाळी सुरू; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com