Maharashtra MLC Election:  saam tv
महाराष्ट्र

विधानपरिषदेत रीलस्टार्सनं पाजलं दिग्गजांना पाणी, विद्यमान आमदारांच्या विजयाचं गणित बिघडवलं

Maharashtra MLC elections : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत रीलस्टार अपक्ष उमेदवारांनी लक्ष वेधून घेतले.

Rohit Kadam

Nitesh Karale election result : विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना रीलस्टार्समुळे मताचं गणित बदललंय. होय... अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रीलस्टार्सनी प्रस्थापितांना कसं पाणी पाजलंय?... पाहूयात या रिपोर्टमधून...

राज्यातली पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक गाजली ती रीलस्टार्समुळे...या रीलस्टार्सनी निवडणुकीत मात्र दिग्गजांचा मूड ऑफ केला. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये रीलस्टार्स किंग मेकरच्या भूमिकेत दिसले. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कराळे मास्तरांनी प्रस्थापितांना धक्का दिलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी नाकारल्यानंतरही निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले नितेश कराळे अपक्ष म्हणून मैदानात उतरले. इतकचं काय तर 25 हजारांहून अधिक मताधिक्यांनी तिसऱ्या क्रमांकावर आले.

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात प्रस्थापित उमेदवारांपेक्षा जास्त चर्चा रंगली ती रीलस्टार रविराज साबळेंची... सरकारविरोधात टीकेचे आसूड ओढणाऱ्या रविराज साबळेंना सरकारनं अटकही केली होती. मात्र, मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून रविराज साबळेंनी सरकारला थेट आव्हान दिलं. आणि फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नसताना साबळेंनी या निवडणुकीत चक्क गेम फिरवला. या निवडणुकीत रविराज साबळेंनी 20 हजारांहून अधिक मते मिळवली.

यावेळच्या पदवीधर निवडणुकीत अनेक रीलस्टार्सनी उमेदवारी दाखल केली. पुण्यात नामदेवराव जाधव, अरुणराज जाधव यांसारख्या सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असणाऱ्या इन्फ्लुएंसरनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, नागपूरात कराळे मास्तरांमुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी थेट 'डेंजर झोन'मध्ये आले. तर मराठवाड्यात रविराज साबळेंच्या जोरदार मुसंडीमुळे सलग तीन टर्म आमदार असलेल्या सतीश चव्हाणांचं गणित बिघडलं. त्यामुळे निवडणुकीत विजय प्रस्थापितांचा झाला असला तरी खरी हवा केलीय़ ती रीलस्टार्स असणाऱ्या अपक्ष उमेदवारांचीच...

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत धक्कादायक निकाल; ठाकरे गटाच्या उमेदवारासह 41 पैकी 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

MLC Election Results: विधानपरिषदेत शरद पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी, शिंदेंच्या सरदाराची पवारांना साथ

मराठवाडा पदवीधरमध्ये दादांच्या NCPला फटका, शिंदेंची ताकद वाढली, दादांच्या राष्ट्रवादीचं काय?

Treadmill Walking Vs Outdoor Walking: ट्रेडमिलवर चालणे की बाहेर चालणे, आरोग्यासाठी काय बेस्ट?

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नका, संजय गायकवाडांचा महामुर्खपणाचा सल्ला

SCROLL FOR NEXT