SHINDE SENA INTERNAL RIFT OVER MLC ELECTION CANDIDATES MAHARASHTRA POLITICS Saam tv
महाराष्ट्र

MLC Election : महायुतीत पुन्हा रस्सीखेच! भाजप-शिंदेंची शिवसेना आमनेसामने; पाहा कुणाकडे किती मतांची संख्या

BJP and Shiv Sena conflict over MLC seat : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Namdeo Kumbhar

माधव सावरगावे, साम टीव्ही मराठी

Maharashtra Legislative Council election : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेसाठी महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा मतदारसंघ पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेकडे राहिल्यामुळे, "हा मतदारसंघ आमचाच आहे आणि तो आम्हालाच मिळावा," असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. दुसरीकडे, मागील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत भाजपने मारलेली मुसंडी आणि सध्याचे मतदारांचे संख्याबळ पाहता, "ही जागा आमचीच असून आम्हीच लढवणार," अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महायुतीमध्ये अंतर्गत 'कुस्ती' पाहायला मिळत आहे. सध्याच्या बलाबलानुसार भाजपकडे २२१ मते आहेत, तर शिवसेनेकडे १२७ संख्याबळ आहे. संख्याबळानुसार भाजपची दावेदारी पक्की मानली जात असली, तरी पारंपरिक मतदारसंघ असल्याने शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही.

पक्षीय बलाबल (मतदारांची संख्या):

छत्रपती संभाजीनगर जिल्हा:

  • भाजप: १२७

  • शिवसेना (शिंदे गट): १०७

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ४२

  • एमआयएम (MIM): ३६

  • शिवसेना (ठाकरे गट): २५

  • काँग्रेस: १९

  • वंचित बहुजन आघाडी: ०४

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): ०३

  • इतर: ०३

जालना जिल्हा:

  • भाजप: ९४

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): ५१

  • काँग्रेस: २२

  • शिवसेना (शिंदे गट): २०

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ११

  • शिवसेना (ठाकरे गट): ०६

  • स्वीकृत सदस्य: ०८

  • इतर: ११

अर्ज कुणी कुणी घेतले?

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आतापर्यंत २२ उमेदवारांनी एकूण ३८ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून चार उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. यामध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र अब्दुल समीर अब्दुल सत्तार, बाजीराव चव्हाण, नंदकुमार घोडेले आणि भास्कर आंबेकर यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून एक, शिवसेना (ठाकरे गट) एक आणि एमआयएम (MIM) कडून दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असली, तरी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधून नेमकं कोण लढणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दोन्ही जिल्ह्यांचे एकत्रित मतदान (एकूण मतदार: ५८९):

  • भाजप: २२१

  • शिवसेना (शिंदे गट): १२७

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): ५४

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): ५३

  • काँग्रेस: ४१

  • एमआयएम (MIM): ३६

  • शिवसेना (ठाकरे गट): ३१

  • वंचित बहुजन आघाडी: ०४

  • स्वीकृत सदस्य: ०८

  • इतर: १४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT