विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली-परभणीतील भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन या जागेवर दावा सांगितला आहे. saam tv
महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट; परभणी-हिंगोलीच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा

bjp claims parbhani hingoli legislative council seat : विधान परिषद निवडणुकीआधीच राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय. परभणी-हिंगोलीची जागा भाजपला सोडावी, अशी मागणी आता थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे.

Nandkumar Joshi

विशाल शिंदे, परभणी

विधान परिषद निवडणुकीआधी महायुती आणि महाआघाडीच्या घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीतील सर्वच मित्रपक्ष आग्रही असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. त्यात अचानक मोठा ट्विस्ट आला आहे. ही विधान परिषदेची जागा आमच्या वाट्याला यावी, अशी आग्रही भूमिका भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली आहे. थेट मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे.

परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. ही जागा भाजपलाच सोडावी, अशी मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठली आणि ही मागणी लावून धरली आहे.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पत्र देतानाच पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. या मतदारसंघात भाजपकडे ९९ मते आहेत. भाजप विचारांचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गटाची २७ मते आणि इतर मिळून जवळपास १३९ मतदारांचा पाठिंबा भाजपकडे आहे, असा दावा करण्यात आला आहे. ही जागा भाजप सहज जिंकू शकतो, असा विश्वासही भाजपच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला आहे.

ही जागा परंपरेने भाजपकडे राहिलेली आहे. केवळ एकदाच शिवसेनेला ही जागा सोडण्यात आली होती. जिल्ह्यात भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता यावेळी ही जागा भाजपलाच मिळावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. परभणी-हिंगोली विधान परिषद जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे 'फिल्डिंग' लावली जात आहे. येत्या एक-दोन दिवसांत परभणी आणि हिंगोली विधान परिषदेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट होईल.

महायुतीच्या सर्वच पक्षांचा दावा

शिवसेना एकसंघ होती तेव्हा परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे विप्लव बाजोरिया होते. मात्र, शिवसेनेत फूट पडून दोन गट झाले. आता या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे यावेळीही ही जागा शिंदे गटाच्या शिवसेनेलाच सुटण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र, महायुतीतील सर्वच पक्षांनी या जागेवर दावा ठोकला आहे. उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून आपापला दावा सांगण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनीही पक्ष नेतृत्वाकडे जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कोणत्या पक्षाचे किती सदस्य?

  • एकूण सदस्य - ४६५

  • राष्ट्रवादी काँग्रेस (AP) – १३१

  • भाजप – ९९

  • शिवसेना (शिंदे गट) – ७७

  • काँग्रेस – ५९

  • शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – ४३

  • यशवंत सेना – २७

  • जनस्वराज्य – १३

  • रासप – ५

  • अपक्ष – ६

  • पूर्णा शहर आघाडी – २

  • जनता दल – २

  • वंचित – १

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thusday Horoscope : आज ग्रहांची मोठी उलथापालथ होणार! या ६ राशींचे नशीब फळफळणार; गुरुवारचे राशीभविष्य

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT