Vidhan Parishad Election Saam Digital
महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पूर्ण, १२ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद; कधी लागणार निकाल?

Sandeep Gawade

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि गेले काही दिवस राज्यात हाय होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. घोडेबाजार क्रॉस वोटींग टाळण्यासाठी सर्वच पक्षांची ताकद पणाला लागली होती. आमदारांना ५ स्टार ह़ॉटेलची मेजवाणीही देण्यात आली होती. आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आजचं निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान पराभवाचा झटका बसणारा तो १२ वा उमेदवार कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

कोण आहेत निवडणुकीच्या रिंगणात ?

भाजप: पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): शिवाजीराव गर्जे,राजेश विटेकर

शिवसेना (एकनाथ शिंदे गट): कृपाल तुमाने,भावना गवळी

काँग्रेस :प्रज्ञा सातव

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : मिलिंद नार्वेकर

शेकाप (शरद पवार गटाचे समर्थन) :जयंत पाटील

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १४ अर्ज दाखल करण्यात आले होते, मात्र २ अर्ज बाद झाले. त्यामुळे ११ जागांसाठी १२ उमेदवार आहेत. महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार आहेत. विधानसभेत सध्या २८८ पैकी 274 आमदारांचं संख्याबळ आहे. यानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या 23 मतांची आवश्यकता आहे. महायुतीकडे सध्या २०० आमदारांचं संख्याबळ असून विधान परिषदेसाठी ९ उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडे ६५ आमदारांचं संख्याबळ असून ३ उमेदवार दिले आहेत.

दरम्यान आज मतदानादिवसी गणपत गायवाड यांच्या मतदानावरून संपूर्ण दिवसभर नाट्यमय घडोमोडी पहायला मिळाल्या. २०२२ मध्ये अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानासाठी परवानगी मागण्यात आली होती. न्यायालयाने ती नाकारली होती. मात्र आजच्या निवडणुकीत भाजप आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणात तुरुंगात असताना त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली. त्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता. त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं होतं. मात्र निवडणूक आयोगाने त्यांना मतदानासाठी परवानगी दिली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर टीका करताना, "अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी कोर्टाने मतदानाची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे गायकवाड यांच्याबाबत फ्रॉड निर्णय दिला आहे. तरीही महविकासआघाडीचे तीनही उमेदवार जिंकतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"न्यायाची समानता नाही हे गेल्या काही वर्षात पहायला मिळालं आहे. नैसर्गिक न्याय प्रक्रिया पाळल्या जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गणपत गायकवाड यांना अत्यंत गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा दिली असताना त्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर गुन्हा नोंद आहे, पण त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, तरही परवानगी नाकारली होती, हा दुजाभाव दुजाभाव चांगला नाही, अशी टीका कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT