Vidhan Parishad Election  Saam Tv
महाराष्ट्र

Vidhan Parishad: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १४ सदस्य रिंगणात, नार्वेकरांना मैदानात उतरवून ठाकरेंनी कोणती खेळी केली?

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या ११ जागा मिळवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष कामाला लागले असून बैठकांचं सत्र सुरूय. नेहमी एक डाव पुढे असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना या निवडणुकीत मात देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक नवी खेळलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदेही काणेकर, साम प्रतिनिधी

विधान परिषदेच्या ११ जागा यंदा बिनविरोध होणार असल्याची चर्चा प्रामुख्याने रंगली होती. मात्र आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने ११ जागांसाठी तब्बल १४ अर्ज भरले गेले. यात महायुतीतर्फे ९ जागांवर उमेदवारी अर्ज भरण्यात आले तर महाविकास आघाडीतर्फे ३ अर्ज भरण्यात आले. या व्यतिरिक्त आणखी २ अपक्ष अर्ज देखील भरण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपले विश्वासू आणि प्रत्येक राजकीय पक्षाशी जवळीक असलेले ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवून वेगळी खेळी केल्याची चर्चा रंगात आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी प्रत्येक राजकीय पक्ष कसून तयारीला लागला आहे. अशातच महायुतीतील भाजपने सगळ्यात जास्त म्हणजे ५ उमेदवार दिले आहेत तर शिवसेना शिंदे गटाने २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने २ असे तब्बल ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी प्रत्येकी १ उमेदवार असे ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत.

तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी प्रत्येकी १ उमेदवार असे ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. महाविकास आघाडी कडे ३ उमेदवार निवडून येतील इतका पक्षीत बलाबल आहे. काँग्रेसकडे ४५, ठाकरे गटाकडे १६ आणि शरद पवार गटाकडे १३ मते आहेत. या मतांची एकूण टोटल ७३ होते. मतांचा कोटा २३ चा आहे. त्यामुळे ७४ संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना २४ मते मिळू शकतात. आकड्याचे गणित पाहता महाविकास आघाडीच्या तिन्ही सदस्यांचा विजय हा निश्चित आहे.

मात्र क्रॉस वोटिंगची शक्यता पहाता या तीनपैकी एका उमेदवारीच्या यशाबाबत साशांकता देखील व्यक्त होत आहे. यातच वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोलकर प्रणिती शिंदे या तीन महिला आमदारांच्या खासदारकीमुळे त्या वोटिंग करू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ ४२ इतके होत आहे. अशातच काँग्रेसच्या अंतर्गत नाराजी आणि लोकसभेप्रमाणे गटबाजीचा परिणाम या निवडणुकीवर पडण्याची शक्यता देखील आहे. मात्र महायुतीबाबत पाहिल्यास सध्या महायुतीकडे १९५ इतके संख्याबळ आहे. ज्यात ८ उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र ९ वा उमेदवार महायुतीने विधान परिषदेच्या रिंगणात उभा केल्याने अपक्षांसह महाविकास आघाडीच्या आमदारांच्या वोटिंग वर देखील महायुतीचा डोळा असल्याचे दिसून येत आहे.

एकूणच हा सगळा प्रकार पहाता सेफ गेमची बाजू सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपला हुकमी एक्का यंदा विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलाय . मिलिंद नार्वेकर यांनी विधान भवनात येऊन अर्ज दाखल केला. मात्र लगेच यांनी विरोधात असलेल्या भाजपच्या नेत्यांची भेट घ्यायला सुरुवात केली. मिलिंद नार्वेकर आणि विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी कोपऱ्यात जाऊन कानगोष्टी केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. तर मिलिंद नार्वेकर यांनी लगेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची पण भेट घेतली.

२०२२ जून ला राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत झालेले क्रॉस वोटिंग आणि पक्षफुटीमुळे राजकारणाचे वेगळे वळण पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा विधान परिषद निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात गरजेपेक्षा जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्या आमदारांची रस्सीखेच होते? तसेच २३ मतांचे गणित जमवण्यासाठी कोणत्या सदस्यांची कोणती राजकीय खेळी पाहायला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोचलीय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT