Loksabha Election BJP  Saam Tv
महाराष्ट्र

Vidarbha Politics : विदर्भात 10 लोकसभा जागांसाठी भाजपाची जोरदार तयारी; महायुतीत कोणाला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष

Loksabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारं वाहायला लागलंय. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे विदर्भात (Vidarbha) 10 लोकसभा जागेवर भाजप आपला गड मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vidarbha Loksabha Election BJP Seats

भाजप लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी राज्यातील ४८ जागा जिंकण्यासाठी आपली तयारी सुरू केलीय. विदर्भात (Vidarbha Politics) १० जागांवर आपला गड मजबूत करण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय. (latets political news)

मागील वेळी विदर्भात काँग्रेसला एकच खासदार निवडणून आणता आला. यंदा भाजप (Loksabha Election 2024 BJP) आपल्या चिन्हावर खासदार निवडणून आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. शिंदे गटाकडे सध्या कृपाल तुमाणे, आणि भावना गवळी या दोन जागा विदर्भात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणाला किती जागा

भाजप (BJP) महायुतीत अजित पवार (ajit pawar) गटाला एकच जागा सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाकडे (shinde group) दोन जागा आहेत. शिंदे गटासाठी अजून किती जागा सोडतात, याकडेही लक्ष लागलं आहे.

मागील वेळी राष्ट्रवादीला भंडारा, गोंदिया, अमरावती आणि बुलढाणा अशा तीन जागा दिल्या होत्या. यंदा मात्र धर्मराव बाबा हे गडचिरोली जिल्ह्यातून लढण्यास इच्छुक आहेत. प्रफुल पटेलांनी सुद्धा आपण भंडारा गोंदियातुन लढण्यास इच्छुक असल्याचं बोलून दाखवलंय. तेच नवणीत राणा या सुद्धा यंदा अजित पवार यांच्याकडून लढतात, की भाजप त्यांना उमेदवारी देणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं (Loksabha Election 2024) नाही.

सर्वच मतदार संघात समांतर तयारी

त्यामुळे यंदा भाजप आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी सर्वच मतदार संघात समांतर तयारी करत आहे. रामटेकची जागा शिंदे गटाकडे असली, तरी ती जागा सुद्धा भाजपच्या चिन्हावर लढली जावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा (Loksabha Election) आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघावरही भाजपने दावा केलाय. महायुतीमध्ये रामटेक मतदार संघ सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाचे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील पुढचा खासदार हा कमळावरचा असावा, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितलं. आमची तिथे ताकद असल्याचाही त्यांनी बोलून (maharashtra politics) दाखवलं. मात्र, इथून कोणी लढायचे? याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वच घेईल, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT