Pune News: पुण्यातील ललित कला केंद्रात भाजप कार्यकर्त्यांकडून तोडफोड; पोलिसांकडून १० ते १२ जणांविरोधात गुन्हा

Pune Lalit Kala Kendra News: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रात शनिवारी (३ फेब्रुवारी) भाजप कार्यकर्त्यांनी राडा घालत तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
Pune University
Pune UniversitySaam tv

Pune Lalit Kala Kendra Latest News

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्रात शनिवारी (३ फेब्रुवारी) भाजप कार्यकर्त्यांनी राडा घालत तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune University
Shivsena News: उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्याआधीच ठाकरे गटाला मोठा धक्का, ५०० शिवसैनिक मनसेत प्रवेश करणार

मागील काही महिन्यापासून पुण्यातील (Pune News) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

मात्र, या नाटकातील संवादावर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी काही जणांनी कला केंद्राची तोडफोड करत नाटकाचा प्रयोग उधळून लावला. इतकंच नाही, तर काही भाजप कार्यकर्त्यांनी नाटकातील काही कलाकारांना धक्काबुकी करत प्रेक्षकांना देखील हाकलून लावलं. (Latest Marathi News)

याप्रकरणी पोलिसांनी नाटकातील संवादातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह ६ जणांना अटक केली. त्याचबरोबर ललित कला केंद्रात तोडफोड करत कलाकार तसेच प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

Pune University
Weather Alert: वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात मोठा बदल; दिल्लीसह १५ राज्यांमध्ये कोसळणार पाऊस, IMD कडून अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com