राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अजूनही थांबायला तयार नाही. दुसरीकडे अधिकृत आणि अनधिकृत सावकारीचा विळखा बळीराजा भोवती आणखी घट्ट होतोय. विदर्भ आणि मराठवाड्यात तर ही स्थिती गंभीर आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात परवानाधारक सावकारांनी 1 हजार 288 कोटींचं कर्ज वाटल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. यामध्ये बिगर शेती कर्जाचं प्रमाण अधिक दाखवून मनमानी व्याज वसूल केलं जातंय. अनधिकृत सावकारांकडून होणारी लूट रोखण्यात कायदे अपुरे पडत असून, बँकिंग व्यवस्थेतील दोषांमुळे ग्रामीण भागात ही स्थिती गंभीर बनलीय.
विदर्भ-मराठवाड्याला सावकारी फास
12,211 नोंदणीकृत सावकारांकडून 5.54 लाख व्यक्तींना 1288 कोटींचं कर्ज वाटप
नोंदणी नसलेल्या अनधिकृत सावकारांची संख्या मोठी असून त्यांची कुठलीही नोंद नाही
बँकिंग दोषांमुळे शेतकऱ्यांना वार्षिक 60 ते 122% दरानं कर्ज घ्यावं लागतं
बेकायदा जमिनी बळकावल्याप्रकरणी आतापर्यंत 549 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल
2014 ते 2026 दरम्यान सावकारांनी बळकावलेली 874 हेक्टर जमीन मूळ मालकांना परत
दरम्यान या पार्श्वभूमिवर सहकार खाते आणि गृहविभाग यांची संयुक्त मोहीम राबवण्याचा प्रयत्न करुन खासगी सावकारीला पायबंद करु, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वात जास्त कर्जबाजारी आहे. 2025 मधील आकडेवारी नुसार
राज्यातील शेतकऱ्यांवर खासगी बँकांचे 7,93 789 कोटी, सहकारी बँकांचे 35, 456 कोटी आणि ग्रामीण बँकांचे 9004 कोटी असे एकूण 8,38, 249 कोटींचे कर्ज डोक्यावर आहे.
थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या आणि त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर गगनाला भिडण्याच्या मार्गावर आहे. अवैध सावकारीच्या विळख्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आपली किडनी विकण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करण्याचं आश्वासन राजकीय पक्ष देत असतात. मात्र अस्मानी आणि सुल्तानी संकटाने बळीराजा पिचला असून वेभरवशाच्या शेतीमुळे सावकारी पाशात अडकत चाललाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.