Vibrant Gujrat 2024 Saam TV
महाराष्ट्र

Vibrant Gujrat 2024 : उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत 'व्हायब्रंट गुजरात'चं आयोजन, कसा असेल कार्यक्रम?

Mumbai News Update : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवेश तांदळे

Mumbai News :

महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात गेल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण ढवळून निघत आहे. तर दुसरीकडे गुजरात सरकारने उद्योगांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत कार्यक्रम घेत आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे आज मुंबईतील ताजमहल पॅलेस येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडणार आहे. एकीकडे मुंबईतील, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असतानाच गुजरात सरकारचा मुंबईत कार्यक्रम होत आहे. 'व्हायब्रंट गुजारत' माध्यमातून गुजरात सरकार महाराष्ट्रातील उद्योगाशी संवाद साधणार आहे.  (Latest Marathi News)

कसा असेल कार्यक्रम?

याआधी गुजरात सरकारने नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम आजोजित केला होता. यामध्ये 1500 हून अधिक गुंतवणूकदार आणि उद्योजकांनी सहभाग घेतला होता. नवी दिल्लीतील कार्यक्रमाच्या यशानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकार मुंबईत रोड शो आयोजित करणार आहे. (Political News)

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचं यश, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘विकसित भारत@2047’ ची संकल्पना आणि त्यासाठी गुजरातची तयारी याविषयी मुख्यमंत्री भाषण करतील.

गुजरात सरकार या कार्यक्रमातून फिनटेक, आयटी, बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. मात्र राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याच्या मुद्दा पुन्हा एकदा यानिमित्ताने पुढे येण्याची शक्यता आहे.

मनसेची टीका

अनेक प्रकल्प आतापर्यंत गुजरातमध्ये घेऊन गेले आहेत. गुजरात सरकारची जी रॅली निघणार आहे, त्यात मुख्यमंत्री सामील होणार असतील तर, दुर्दैव आहे. पंतप्रधान फक्त गुजरातचे असल्यासारखी परिस्थिती आहे, अशी टीका मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

SCROLL FOR NEXT