V. S. Achuthanandan Saam Tv News
महाराष्ट्र

लढवय्या कम्युनिस्टचा प्रवास थांबला! माजी मुख्यमंत्र्यांचं वयाच्या १०१व्या वर्षी निधन, राजकारणात मोठी पोकळी

V. S. Achuthanandan: केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांचं वयाच्या १०१व्या वर्षी निधन. तिरुवनंतपुरम येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Bhagyashree Kamble

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांचं आज (सोमवारी) तिरूअनंतपुरम येथील एका खासगी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २३ जून रोजी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आयसीयूमध्ये उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

व्ही. एस अच्युतानंदन हे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केरळचे सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख होती. २००६ ते २०११ या कालावधीत त्यांनी केरळचे मुख्यमंत्रीपद भूषवले. तसेच तीनवेळा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती. जवळपास १९ वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलं. २०१९ साली त्यांनी राजकीय संन्यास घेतला.

व्ही.एस अच्युतानंदन यांचा जन्म १९२३ साली पुथुपल्ली, अलप्पुझा जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव शंकरन असून आईचं नाव अक्कम्मा असे आहे.

कम्युनिस्ट पक्षाच्या विभाजानंतर १९६४ त्यांनी सीपीआय (एम) च्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली होती. ते या पक्षाचे ३२ वे संस्थापक सदस्य झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात १० निवडणुका लढवल्या. यातील ७ निवडणुका जिंकल्या.

व्ही. एस अच्युतानंदन यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात कामगार संघटनेतून केली होती. २००६ साली, वयाच्या ८२व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. पुढील पाच वर्षे ते या पदावर कार्यरत राहिले. गेल्या काही वर्षांपासून ते तिरुवनंतपुरम येथे आपल्या मुलाच्या घरी राहत होते. वयोमानामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता.

व्ही. एस अच्युतानंदन यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'व्ही.एस अच्युतानंदन हे सामान्य कुटुंबातून आले होते. त्यांचा प्रवास प्रेरणादायी होता'. अशी पोस्ट शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

Maharashtra Politics: पालिकांवर नजर, ठाकरेसेनेचं शक्तीप्रदर्शन, भ्रष्ट मंत्र्यांवरून सरकारला घेरलं

SCROLL FOR NEXT