उभ्या एसटी बसला कंटेनरची धडक, चालकासह प्रवाशी जखमी...  लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

उभ्या एसटी बसला कंटेनरची धडक, चालकासह प्रवाशी जखमी...

बस आणि मालवाहू कंटेनरचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना जालना अंबड महामार्गावर गोलापांगरी गावाजवळ घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: बस आणि मालवाहू कंटेनरचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना जालना अंबड महामार्गावर गोलापांगरी गावाजवळ घडली आहे. या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले असून दहा ते बारा प्रवाशीही या अपघातात किरकोळ जखमी झाल्याची माहिती सामोर आली आहे.

हे देखील पहा -

महाराष्ट्र राज्य महामंडळाची बस क्रमांक एम एच-१४ बी.टी.२१९१ आज दुपारी दीड च्या सुमारास प्रवाशी घेण्यासाठी गोलपगारी रोड वरील बस स्टॉप वर थांबली असताना, भरधाव वेगाने येणारा मालवाहू ट्रॅक आणि मालवाहू कंटेनर एकमेकांना ओव्हरटेक करत असताना कंटेनर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कंटेनर स्टॉपवर प्रवाशी घेत असलेल्या बसवर येऊन आदळल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात बस चालकासह कंटेनर चालकही गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचरासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बसला जोरदार धडक बसल्याने बसमध्ये असलेले दहा ते बारा प्रवाशीही या अपघातात किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर गोलपांगरी येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे, सुदैवाने दोन्ही वाहनाचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

SCROLL FOR NEXT