OBC Leader Targeted in Ahilyanagar Saam tv
महाराष्ट्र

'ही काय स्टंटबाजी वाटते का?' कारवरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके संतापले; मनोज जरांगेंना सुनावलं

OBC Leader Targeted in Ahilyanagar: हाकेंच्या वाहनावर हल्ला. प्रसिद्धीसाठी हल्ला करवून घेतला, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. हाकेंनी जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिलं.

Bhagyashree Kamble

  • लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर हल्ला.

  • प्रसिद्धीसाठी हल्ला करवून घेतला- जरांगे पाटील

  • हाकेंची प्रतिक्रया.

अहिल्यानगरमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञाताने हल्ला केला होता. काठी अन् दगड मारून हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडल्या. अहिल्यानगरच्या दैत्यांदूर येथे ओबीसी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यासाठी जात असतानाच त्यांच्या कारवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर साम टिव्हीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, 'या हल्ल्याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट आणि शासनाने करावी. आता सशंय नेमका कुणावर घ्यायचा? आतापर्यंत आठ ते नऊ वेळा माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. हल्लेखोरांनी २ वाहनांवर हल्ला केला आहे. २ गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. २ पोलीस व्हॅन असताना, १० ते १२ पोलिसांचा स्टाफ असताना हल्ला झाला.'

'मोठ्या लाकडी बांबू आणि दगडाने हल्लेखोर हल्ला करत असतील, तर यांना कायदा आणि पोलिसांचा धाक आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही', असं हाके म्हणाले. 'आमचा गुन्हा काय तर , आम्ही ओबीसीचे प्रश्नाला वाचा फोडतोय',असं हाके म्हणाले.

लक्ष्मण हाकेंनी काल त्यांच्या फेसबुकवर, 'शत्रु वाढतायेत', अशी पोस्ट लिहिली होती. आज त्यांच्यावर हल्ला झाला. यावर हाके म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर वारंवार होणाऱ्या हल्ल्याची चौकशी करावी. आतापर्यंत ९ वेळा हल्ला झाला आहे. कुणीही हा मुद्दा गांभीर्याने घ्यायला तयार नाही' असंही हाके म्हणाले.

मनोज जरांगे पाटलांना सुनावलं

हाकेंच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, प्रसिद्धीसाठी हल्ले करवून घेतात, असं ते म्हणाले. यावर हाकेंनी प्रतिक्रिया दिली. 'जरांगे मूर्ख माणूस आहे. पोलिसांसमोर आम्ही स्टंट करतो का? आतापर्यंत ८-९ वेळा हल्ले झाले. ते हल्ले स्टंट होता का?' असं हाके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer India: जगात कॅन्सर कमी; भारतात मात्र वाढ! तज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

High Court: विभक्त असेल तरी पत्नीला मिळेल फॅमिली पेन्शनचा लाभ; उच्च न्यायालयाचा निर्णय

Hingoli: राज्यात पावसाचं रौद्ररूप! पण दुसरीकडे शिंदेंच्या राम कदमांच्या नवरात्रौत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम

Maharashtra Live News Update: मंदिरात दर्शनासाठी जात असताना अंगावर भिंत कोसळली

Election : महानगरपालिका निवडणुकासंदर्भात मोठी अपडेट, 'स्थानिक'नंतर मनपा निवडणुकीचा बार उडणार?

SCROLL FOR NEXT