Vedant Deokate Nagpur Kid
Vedant Deokate Nagpur Kid संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur News: १५ वर्षीय वेदांतला अमेरिकी कंपनीकडून तब्बल '33 लाख' पगाराची ऑफर!

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: नागपूरच्या (Nagpur) १५ वर्षीय वेदांत देवकाते (Vedant Deokate) याला अमेरिकन कंपनीने वर्षाला तब्बल ३३ लाख रुपये पगाराची ऑफर (Job Offer) दिली आहे. वेदांतने न्यू जर्सी येथील इन्फोलिंग्ज या जाहिरात कंपनीच्या स्पर्धेत भाग घेतला होता. जगभरातील एक हजार स्पर्धकांपैकी तो एकमेव विजयी ठरला. मात्र, तो केवळ १५ वर्षाचा असल्याने त्याला ती नोकरी स्वीकारता आला नाही. (Nagpur Latest News)

हे देखील पाहा -

१५ व्या वर्षी आहे स्वतःची वेबसाईट

नागपुरातील १५ वर्षीय वेदांत देवकाते हा मध्यम वर्गीय कुटुंबातील एक सामान्य पण कुशाग्र बुद्धीचा मुलगा आहे. वेदांतची आई सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर वडील इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक आहे. वेदांतने संगणकाचे धडे त्याच्या आईकडून घेतले. लॉकडाऊन काळात आई ऑनलाईन क्लासेस घ्यायच्या. आई शिकवत असताना तो डोकावून बघायचा, विचारायचा आणि त्यातूनच त्याला संगणक आणि सॉफ्टवेअरबद्दल आवड निर्माण झाली. वेदांतने animeeditor.com नावाची वेबसाइट तयार केली आहे. ही वेबसाइट YouTube सारखे व्हिडिओ अपलोड करण्याचा पर्याय देते. यात ब्लॉग, चॅटबॉक्स, व्हिडिओ पाहण्याचे प्लॅटफॉर्म यासारख्या वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. या वेबसाइटवर प्रोफाइल एडिट करता येतात. लाइव्ह फॉलोअर्स आणि लाईक्स मिळवण्याचाही एक मार्ग आहे, असे वेदांत म्हणाला.

अशी मिळाली ३३ लाख पगाराची ऑफर

अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील इन्फोलिंग्ज या जाहिरात कंपनीने सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासंदर्भात एक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत वेदांतने भाग घेतला आणि देशभरातील १ हजार सहभागी स्पर्धकांपैकी पहिला क्रमांक पटकावला. कंपनीने त्याला वर्षाला ३३ लाख पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. मात्र, तो केवळ १५ वर्षांचा असल्याचं कळल्यावर त्याला १८ वर्षांनंतर तू कंपनी जॉइन करू शकतो असं कळवलं.

असा करायचा अभ्यास

वेदांत सध्या दहावीत आहे. तो लॅपटॉप आणि मोबाईलवर अधिक राहत असल्यानं त्याच्या वडिलांनी लॅपटॉप आणि मोबाईल लपवून ठेवला. मात्र, रात्री घरचे झोपल्यावर तो अभ्यासासोबत लॅपटॉपवर सॉफ्टवेअरसंबंधी काम करायचा. त्यातून त्याचा अनुभव अधिक वाढत गेला. त्याने लॅपटॉपचा चांगल्या कामासाठी उपयोग केला आणि त्यातूनच त्याने इतकी मोठी उपलब्धी कामविल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

मोबाईल आणि लॅपटॉपचा चांगल्या कामासाठी उपयोग

वेदांतची आई सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यांच्याकडून वेदांतला संगणक, सॉफ्टवेअर, कोडिंग याचे धडे मिळाले. आईचं काम बघून त्याचा संगणकाबद्दल आवड निर्माण झाली. त्याने स्वतःचं ऑनलाइन कोर्सेस केले आणि त्यातूनच तो या विषयात निष्णात झाला. सध्या संगणक किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलं बिघडत चालल्याचा सूर पालकांकडून नेहमी व्यक्त होत असतो. अनेक मुलं संगणक आणि मोबाईलच्या आहारी जाऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. मात्र, वेदांतनं या संगणक आणि मोबाईलचा चांगला उपयोग करत यश मिळवलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Rikshaw Viral Video | भर उन्हात रिक्षावाल्याचा एक नंबर जुगाड!

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राडा आणि हायव्हॉल्टेज ड्रामा! बारामतीत काका-पुतण्याचे समर्थक आमने-सामने

Peruchi Chatani: चटकदार! कच्च्या पेरूची स्वादिष्ट चटणी, सोपी रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे माहिती आहेत का?

Amol Kolhe: आधी आरोप, आता थेट पुरावे दाखवले; अमोल कोल्हेंनी वाढवलं आढळराव पाटलांचं टेन्शन.. प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT