Vasota Fort News, Satara News, vasota fort jungle trek prohibited from june to october 2023 saam tv
महाराष्ट्र

Vasota Fort News : दूर्गप्रेमींनाे ! वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद; जाणून घ्या कारण

Vasota Fort Trekking : साहसी गिर्यारोहकांना हा किल्ला सर करणे फार आवडते.

Siddharth Latkar

Vasota Fort News : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली (sahyadri tiger reserve bamnoli) परिक्षेत्रातील वासोटा किल्ला पर्यटनासाठी (vasota trek) आजपासून (ता. 16 जून) बंद करण्यात आला आहे. तरी सर्व पर्यटक, पर्यटन व्यावसायिक व बोट क्लब यांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन बा.दि.सबनिस (वनक्षेत्रपाल वन्यजीव, बामणोली) यांनी केले आहे. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यातील घनदाट कोयने अभयारण्यात वासोटा किल्ला नावाचा वनदुर्ग आहे. व्याघ्रगड हे या किल्ल्याचे दुसरे नाव आहे. साहसी गिर्यारोहकांना हा किल्ला परिपूर्ण वाटताे. किल्ल्यामध्ये पाण्याची टाकी, राजवाड्याचे अवशेष, शिवमंदिर आहे आणि बाबूकडा नावाने ओळखला जाणारा मोठा किनारा हे त्याचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. हा किल्ला सर करण्यासाठी देश-परदेशातून पर्यटक येत असतात.

दरम्यान जून ते आॅक्टाेबर या कालावधीत हा किल्ला पर्यटनासाठी प्रतिवर्षी बंद ठेवण्यात येताे. यंदा आजपासून (ता.16 जून) या किल्ल्यावर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. पुढील पर्यटन हंगाम सूरु होण्याविषयीच्या सूचना पावसाळ्यानंतर वरिष्ठ कार्यालयाचे आदेशांप्रमाणे देण्यात येतील असे अधिका-यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

बा.दि.सबनिस (वनक्षेत्रपाल वन्यजीव, बामणोली) म्हणाले बहुतांश वन्य प्राण्यांचा प्रजननचा कालावधी असताे. या काळात पर्यटक वासाेटा किल्ल्यावर आल्यास वन्य प्राण्यांना अडचणीचे ठरु शकते. त्याचप्रमाणे परिसरात माेठ्या प्रमाणात पाऊस पडताे. किल्ला मार्गावरील नाले, आेढे , आेव्हळाचे पाणी वेगाने वाहत असते.

तसेच अतिपावसामुळे भूस्खलन हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघात घडू शकतात. हे टाळण्यासाठी जून ते आॅक्टाेबर या कालावधीत वासाेटा किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तरी सदर कालावधीत वासोटा येथे प्रवेश वर्जित असून कोणी प्रवेश केल्याचे आढळल्यास प्रचलित कायदा व नियमांप्रमाणे कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT