vashi villagers morcha at nagar panchayat demands regular water supply  Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv : वाशी नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा, संतप्त महिलांचा ठिय्या;गेले अधिकारी कुणीकडे?

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा व नागरीकांचे होणारे हाल थांबविण्याच्या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. या माेर्चा महिला माेठ्या संख्येने सहभागी झाल्या हाेत्या.

वाशी येथे नगरपंचायत मार्फत करण्यात येणारा पाणी पुरवठा हा सुरळीत नाही. त्यामुळे टॅंकरचा आधार नागरीकांना घ्यावा लागत आहे. परिणामी आर्थिक बाेजा नागरिकांवर पडत आहे. तसेच अनेकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या स्वराज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान आंदाेलकांचे गा-हणे ऐकण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे फोनद्वारे संबधितांना पाणी सुरळीत करण्याची मागणी आंदाेलकांना करावी लागली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Thane Visit: पीएम मोदींच्या सभेसाठी वाहतुकीमध्ये मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Marathi News Live Updates : महायुतीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा जुंपली; भरसभेत एकमेकांना कोपरखळ्या

Cake Cancer News : सावधान! केक खाल्ल्याने कॅन्सर होतो, खळबळ उडवून देणारा दावा; व्हायरल मॅसेजमागचं सत्य काय?

Ishan Kishan: इशान किशनचं टेन्शन वाढलं! हा स्टार खेळाडू जागा घेण्यासाठी तयार; आता कमबॅक करणं कठीण

Gold Silver Rate : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, चांदी २ हजार रुपयांनी महागली; आजचा भाव वाचलात का?

SCROLL FOR NEXT