सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी
Vasant More : मनसेला 'जय महाराष्ट्र' म्हणत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना उद्धव ठाकरेंशी गट्टी करत शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्षांतर केले. ठाकरे गटामध्ये गेल्यानंतर वसंत मोरे यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली. त्यांना महानगरपालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपद देण्यात आले. या धामधुमीमध्ये वसंत मोरे यांच्या नावाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत आहे.
वसंत मोरे यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसत आहेत. वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांसह 'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला' या 'फ्रँडी' चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने वसंत मोरे यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये त्यांनी मनसोक्तपणे गाण्यांवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वसंत मोरे यांचे याआधीही अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते पुष्पा चित्रपटातल्या 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स करताना दिसले होते. वसंत मोरे यांनी गाण्यावर श्रीवल्लीची आयकॉनिक स्टेप देखील केली होती.
पुण्यात वसंत मोरे यांचे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह बिनसले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला राजीनामा दिला होता. त्यानंतर ते आनंदराज आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुका लढताना पराभव झाल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.