Electricity Theft Saam tv
महाराष्ट्र

Electricity Theft: ८४ वीज चोरांविरुद्ध कारवाई; ८० हजार युनिट वीज चोरी उघड

चेतन इंगळे

वसई : महावितरणकडून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाई दरम्यान (Vasai) वसई पूर्व उपविभागात राबविलेल्या मोहिमेत ८४ वीज चोर आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ८० हजार ३७२ युनिट विजेची चोरी (Mahavitaran) झाल्याचे उघडकीस आले आहे. (Tajya Batmya)

महावितरणकडून विजेचा अनधिकृत वापर करत असलेल्यांविरुद्ध धडक मोहीम राबविली जात आहे. याकरिता पथक नेमण्यात आले आहेत. या दरम्यान १६ पथकांनी धानीव बाग, पेल्हार, वाकणपाडा, शिवाजीनगर, वसई फाटा, सोपारा फाटा, दांगडेपाडा, जाधवपाडा, गावदेवी, धानीव भागात व्यापक शोध मोहिम राबवली. एकूण ७५७ वीज जोडण्यांची तपासणी यात करण्यात आली. त्यात ८४ जणांकडे विजेचा चोरटा वापर सुरू (Electricity Theft) असल्याचे आढळले. त्यानुसार संबंधिताना चोरीच्या (MSEDCL) विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. 

तर होणार वीज चोरीचा गुन्हा दाखल 

वीज करत असल्याचे सापडून आलेल्यांकडे ८४ हजाराच्यावर युनिटद्वारे १५ लाख ९ हजार ३०० रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. विहित मुदतीत या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा- २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. वीज चोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा आणि दंडाची तरतूद असून कोणत्याही परिस्थितीत विजेचा अनधिकृत वापर टाळावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT