Vanrang 2026 tribal cultural festival in Mumbai 
शिक्षण

मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 'वनरंग २०२६' चे उद्घाटन, ३ दिवस सुरू राहणार उत्सव

'Vanrang 2026 : मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे 'वनरंग २०२६' या तीन दिवसीय राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • मुंबईतील वनरंग २०२६ सांस्कृतिक महोत्सव

  • सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वनरंग २०२६ उद्घाटन

  • आदिवासी कला आणि हस्तकला प्रदर्शन मुंबई

मुंबईतील नरिमन पॉइंट येथील प्रतिष्ठित वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये तीन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक व पारंपरिक उत्सवाला शुभारंभ झाला. या भव्य उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्याला राज्याचे अन्न व औषध प्रशासन व विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुर्गम जंगले, डोंगर-दऱ्या आणि ग्रामीण भागांत जपलेली कला, हस्तकला आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा देशातील सर्वात महागड्या व प्राइम लोकेशनवर पोहोचवणार आहे. हा सोहळा ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांसाठी आयोजित करण्यात आलाय.भिल्ल, कोकणा, ठाकर आणि गोंड या जमातींची समृद्ध जीवनशैली आणि कला या महोत्सवात दाखवण्यात आलीय. या आयोजनाच्या माध्यमातून आदिवासी कारागीर, वैद्य, महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांशी जोडण्याची संधी मिळालीय. ज्यामुळे आदिवासी कुटुंबांना शास्वातिक रोजगार आणि आर्थिक बळ मिळणार आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ काय म्हणाले?

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यांनी या महोत्सवासाठी पुढाकार घेतला.आदिवासी समाजाचा विकास, हक्क आणि त्यांच्या कलेला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी झिरवाळ यांनी केलेल्या पुढाकाराचे या प्रसंगी कौतुक करण्यात आले. झिरवाळ यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात देशातील पहिले 'ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर' आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) साकारू शकली आहे, यामुळे स्थानिक आदिवासी तरुणांसाठी शिक्षण आणि थेट रोजगाराचे मार्ग खुले झालेत.

महोत्सवातील विविध आकर्षणे

७ ते ९ ऑगस्ट दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत रंगणाऱ्या या महोत्सवात अनेक आकर्षणे पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील भिल्ल, कोकणा, ठाकर, गोंड या ४ प्रमुख जमातींच्या जीवनशैलीचे प्रदर्शन आणि इतिहासाचा पट मांडणारी भव्य प्रदर्शने, १२ इतर राज्यांतील हस्तकलेचे दुकानात उभारण्यात आलेत. मरीन ड्राईव्हवर प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत यांच्या हस्ते 'जनजातीय मोझॅक आर्ट इन्स्टॉलेशन' साकारण्यात आलंय.

महोत्सव काळात पद्मश्री राहीबाई पोपेरे (बीजमाता), पद्मश्री भिकल्या लाड्या धिंडा तसेच मे २०२६ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्रातील पहिले आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासह यासोबतच अर्जुन पुरस्कार विजेती ॲथलीट कविता राऊत यांच्या उपस्थितीत क्रीडा क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा आणि वारली-गोंड पेंटिंगच्या थेट कार्यशाळा होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी ताजचे शेफ रघु देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक पदार्थांचा 'ट्रायबल लंच'ही सादर केला जाईल.

समाजात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल काही मान्यवरांना प्रतिष्ठित 'वनरंग पुरस्कार २०२६'ने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वदेश फाउंडेशन १००० गावांच्या विकासासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री भिकल्या धिंडा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अनिल वसावे यांना क्रीडा क्षेत्रातील कामगिरी (माउंट एव्हरेस्ट गिर्यारोहक) साठी तर पी. अनबलगन (IAS) : औद्योगिक क्रांती आणि योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यकर्मासाठी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व सनदी अधिकारी उपस्थित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काका मला वाचवा, अचानक शिंदे मोदींच्या भेटीला, शिवसेनेचा वाद मोदींच्या कोर्टात?

NCPला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला? प्रशांत किशोर NCPचे नवे सल्लागार?

जळगाव हादरले! शाळा परिसरातच दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने सपासप वार; जुन्या वादातून जीवघेणा हल्ला

धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

NEET पेपरफुटी प्रकरणी एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे, CBI च्या चार्जशीटमध्ये नेमके काय?

SCROLL FOR NEXT