Vande Bharat Train Saam Digital
महाराष्ट्र

Vande Bharat Train : सिगरेटने अडवली सोलापूर वंदे भारतची वाट; धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक

Solapur News : धावत्या सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांने धूम्रपान केल्यामुळे आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला होता. आरपीएफ पोलिसांनी धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक केली आहे.

Sandeep Gawade

धावत्या सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांने धूम्रपान केल्यामुळे आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला होता. परंतु, आरपीएफ पोलिसांनी धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक केली आहे. या गोंधळामुळे मंकी हिल घाट परिसरात काही वेळ वंदे भारत ट्रेन खोळंबली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२२२६ सोलापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरवरून मुंबईसाठी सुटली. त्यानंतर ही मंकी हिल घाट परिसरात आली असताना सी-१ डब्यातील अग्निशोधक यंत्रणा कार्यान्वित झाली. गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्यांनी संबंधित डब्याकडे धाव घेतली. मात्र डब्यात आग लागल्याची कोणतीही घटना घडल्याचे दिसले नाही. आरपीएफ पोलिसांनी यांसंदर्भात चौकशी केली असता, वंदे भारत एक्स्प्रेसमधील सी-१ मधील प्रवासी विकास पाठक डब्यात धूम्रपान करत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे वंदे भारत ट्रेनमधील अग्निशोधक यंत्रणा कार्यान्वित झाली. दरम्यान आरपीएफ पोलिसांनी दोषी प्रवाशांना कल्याण स्थानकात उतरवण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाने त्याला अटक करून रेल्वे न्यायालयात हजार करण्यात आले असून त्याच्यावर कारवाई झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

Horoscope Sunday Update : विठ्ठलाच्या कृपेमुळे भाग्यकारक घटना घडतील, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 14 जुलै रोजी विदर्भातील 6 हजारपेक्षा अधिक दारूचे बार राहणार बंद

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

SCROLL FOR NEXT