Vande Bharat Sleeper Express Saam Digital
महाराष्ट्र

Vande Bharat Sleeper Express : महाराष्ट्रात ३ मार्गावर धावणार स्लिपर वंदे भारत एक्स्प्रेस? मुंबईतून दिल्लीही अवघ्या काही तासांवर

Sandeep Gawade

भारताच्या रेल्वे इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे अनावरण बेंगळुरूमध्ये करण्यात आलं असून अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असलेल्या डब्यांनी प्रवाशांना एक नवीन प्रवास अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. या ट्रेनची सध्या चाचणी सुरू असून या चाचण्या दहा दिवस चालणार आहेत. ज्यामध्ये सॉफ्टवेअर, तांत्रिक उपकरणे, आणि यंत्रणांची तपासणी केली जाणार आहे.

रेल्वेच्या प्रवासातील हा एक मोठा टप्पा असून स्लीपर वंदे भारत ट्रेनमुळे राजधानी एक्स्प्रेस सारख्या लोकप्रिय गाड्यांना एक पर्याय उपलब्ध होणार आहे. वंदे भारत ट्रेनचे खासियत म्हणजे 160 किमी प्रति तास वेग. या चाचण्यां पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत मुंबई ते दिल्ली मार्गावर धावण्याची शक्यता आहे.

मुंबई ते दिल्ली दरम्यान वंदे भारतचा वेग वाढणार

राजधानी एक्स्प्रेस मुंबई ते दिल्लीपर्यंतचा प्रवास सुमारे 16 तासांत पूर्ण करते. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अनावरणाच्या वेळी जाहीर केले की भविष्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन 12 तासांत हा प्रवास पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे भारतीय रेल्वे 'मिशन रफ़्तार' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे गाड्यांचा वेग 160 किमी प्रति तास वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई ते दिल्ली हा 1,478 किमीचा मार्ग असून या प्रकल्पासाठी 8 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेचे क्षेत्रातील या प्रकल्पाशी संबंधित काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. गाड्यांचा वेग अधिक सुरक्षितपणे वाढवता यावा यासाठी जनावरे आणि जंगली प्राण्यासाठी कुंपण आणि पटर्‍यांच्या दोन्ही बाजूंना भिंती उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चाचण्या

9 ऑगस्ट 2024 रोजी रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने (RDSO) मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 20 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसची (सीटिंग) 130 किमी प्रति तास वेगाने यशस्वी चाचणी केली. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये आणि सेक्शनमध्ये 160 किमी प्रति तास वेगाने चाचण्या घेतल्या जाणार आहेत. ही गाडी संपूर्ण मार्गावर 160 किमी प्रति तास वेगाने धावण्यासाठी, रेल्वे पटर्‍यांची स्थिती आणि तांत्रिक स्वरूप देखील सुधारण्यात आले आहे. रेल्वे पटर्‍यांच्या खाली असलेल्या बेसला अधिक विस्तारित केले असून, हे काम गाड्यांच्या वेगात स्थिरता आणण्यासाठी करण्यात आलं आहे.

'कवच' तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता

वंदे भारत ट्रेनच्या वेगात वाढ होत असताना, गाड्यांच्या सुरक्षिततेलाही महत्त्व दिले जात आहे. यासाठी भारतीय रेल्वेने 'कवच' नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग गाड्यांना एकमेकांशी धडक होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. गाड्यांमध्ये कवच लावल्याने, जर कधी गाड्या समोरासमोर धावू लागल्या तर आपोआप ब्रेक लागतील आणि दुर्घटना टाळली जाईल.पश्चिम रेल्वेवर या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी झाली असून वडोदरा-अहमदाबाद, विरार-सूरत, आणि वडोदरा-रतलाम-नागदा या सेक्शनमध्ये चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. हा तंत्रज्ञान रेल्वे सुरक्षा क्षेत्रात एक मोठी क्रांती ठरण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT