Tere Ishq Mein: 'तेरे इश्क में'च्या रिलीजपूर्वी क्रिती सॅनन आणि धनुष पोहोचले वाराणसीला, गंगा आरतीचे फोटो व्हायरल

Shruti Vilas Kadam

'तेरे इश्क में'

क्रिती सॅनन आणि धनुष यांचा 'तेरे इश्क में' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, क्रिती सॅनन आणि धनुष वाराणसीमध्ये पोहोचले.

Tere Ishq Mein

क्रिती सॅनन आणि धनुष

तेरे इश्क में’ चित्रपटाच्या रिलीजआधी क्रिती सॅनन आणि धनुष वाराणसी येथे दाखल झाले असून त्यांनी गंगा आरतीत सहभाग घेतला.

Tere Ishq Mein

वाराणसी

वाराणसी आता अनेक बॉलिवूड कलाकारांचे आवडते ठिकाण बनले आहे. येथे ते केवळ चित्रपटांच्या प्रमोशनसाठीच नाही, तर गंगेचे आशीर्वाद घेण्यासाठी तसेच देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन आपल्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठीही आवर्जून येतात.

Tere Ishq Mein

चाहत्यांसोबत वेळ

बुधवारी, तेरे इश्क की मधील कलाकार धनुष आणि क्रिती सॅनन वाराणसीमध्ये आले. त्यांनी सिग्रा येथील एका मॉलमध्ये चाहत्यांसोबत वेळ घालवला.

Tere Ishq Mein

गंगा आरती

यानंतर, धनुष आणि क्रिती सॅनन यांनी संध्याकाळी उशिरा वाराणसीच्या गंगा आरतीमध्येही भाग घेतला.

Tere Ishq Mein

आऊटफिट

यावेळी, क्रिती सॅनन हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसली आणि तिने डोक्यावर दुपट्टा घातला होता. दरम्यान, धनुष पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये दिसला. धनुष आणि क्रिती सॅननचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Tere Ishq Mein

आनंद एल. राय दिग्दर्शित

हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.

Tere Ishq Mein

Buying Online Shoes: ऑनलाइन शूज खरेदी करताना या गोष्टींची नक्की काळजी घ्या

Buying Online Shoes
येथे क्लिक करा