Lok Sabha Election 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : वंचितने कंबर कसली, मविआच्या निर्णयाआधी लोकसभेची तयारी; सांगलीत उमेदवार 'फायनल'

Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू होणार आहे. मार्चच्या पहिल्या 15 दिवसांत महाराष्ट्रभर आंबेडकरांच्या पाच सभा होणार आहेत.

Sandeep Gawade

Lok Sabha Election 2024

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांची आतापासूनच जोमात तयारी सुरू आहे. वंचितनेही तयारी सुरू केली असून मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू होणार आहे. मार्चच्या पहिल्या 15 दिवसांत महाराष्ट्रभर आंबेडकरांच्या पाच सभा होणार आहेत. महाराष्ट्रात साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले, आणि सांगलीत या सभा होतील. विशेष म्हणजे सांगलीतील आंबेडकरांची सभा निर्णायक होणार आहे. सांगलीच्या सभेपर्यंत महाविकास आघाडीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास आंबेडकर मोठी भूमिका घेणार आहेत.

सांगलीत वंचितचा उमेदवार 'फायनल'.

डबल महाराष्ट्र केसरी 'चंद्रहार पाटील' हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा वंचितच लढणार आहे, अशी माहिती वंचितच्या सूत्रांनी दिली आहे. वंचित महाविकास आघाडीकडे सांगलीची मागणी करणार आहे. चंद्रहार पाटलांनी मागच्या महिन्यात मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. या आठवड्यात होणाऱ्या जाहीर सभेत चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचितचेही प्रतिनिधी होते. वंचिते जागावाटबाबात आपला प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडीत ज्या जागांचा तिढा अद्याप सुटललेला नाही. त्या जागावंर वंचितने दावा केला होता. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

या तारखेला होणार आंबेडकरांच्या सभा

1) 4 मार्च : साकोली

2) 6 मार्च : नवी मुंबई

3) 7 मार्च : मुंबई

4) 8 मार्च : हातकणंगले

5) 14 किंवा 15 मार्च : सांगली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडकरांसाठी खूशखबर, बीड - वडवणीदरम्यान लवकरच रेल्वे धावणार; आज होणार इंजिन चाचणी

Maharashtra Live News Update: शरद पवार घेणार बाबा आढाव यांची भेट

VitaminB12 Facts: हाय-पाय सुन्न, मुंग्या येतात? शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता, वेळीच ओळखा

Accident : अयोध्येला जाताना भीषण अपघात! भाविकांच्या बसला ट्रेलरची धडक, एकाचा मृत्यू तर ३० जखमी

Kalyan - Dombivali : कल्याण-डोंबिवलीतील वादावर पडदा पडणार? एकनाथ शिंदे - रवींद्र चव्हाण येणार एकाच मंचावर| VIDEO

SCROLL FOR NEXT