Walmik Karad  Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad surrender : मोठी बातमी! वाल्मीक कराड पोलिसांना शरण

Walmik Karad surrender : केजमधील खंडणीतील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड पुणे पोलिसांत शरण गेला आहे. तीन आठवड्यांपासून याप्रकरणामुळे बीड राज्यात चर्चेत होतं.

Namdeo Kumbhar

Valmik Karad surrenders to Pune police: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड यानं पुणे शहर पोलिसांकडे सरेंडर केलेय. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. त्यावेळी पुण्यात पोलिसांच्या कार्यालयाबाहेर कराड याच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.

केज पोलीस स्टेशनला माझ्याविरोधात खोटी खंडणीची तक्रार दाखल झालेली आहे. अला अटकपूर्वचा अधिकार असताना मी पाषाण येथील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा करावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जर काही सिद्ध झालं तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे, असे सरेंडर होण्याआधी वाल्मीक कराड यांनी सांगितले.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात बीडच्या सुरक्षा व्यवस्थेची राज्यात चर्चा सुरू होती. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. गेल्या आठवड्यात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाही निघाला होता. या प्रकरणामुळे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर आरोपांचा सपाटा लावला होता. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला होता.

९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख याची अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. वाल्मीक कराड यानं आत्मसमर्पण केलेय. याप्रकरणातील पाचवा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. तीन आठवड्यांपासून वाल्मीक कराड फरार होता. वाल्मीक कराड याचा शोध घेण्यासाठी सीआयडीने स्पेशल पथके तयार करून मागावर लावली होती, त्याशिवाय त्याचा पासपोर्ट आणि बँक खाती फ्रीज केली होती. सर्व बाजूने अडचणीत आल्यानंतर वाल्मीक कराड यानं शरण येण्याचा निर्णय घेतलाय.

वाल्मिक कराड शरण येणार याची बातमी सकाळी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. त्यानंतर वाल्मक कराड याच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात सीआयडी कार्यलयाबाहेर गर्दी केली होती. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला असल्याचे समर्थकांचे म्हणणं आहे. बीड आणि अहमदनगरवरून आलेल्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर गर्दी जमली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT