Mahadev Munde Case Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case: वाल्मीक कराडनेच महादेव मुंडे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शिला संपवलं, जुना सहकारी बांगरचा खळबळजनक दावा

Walmik Karad: बीडच्या महादेव मुंडे हत्याकांड प्रकरणात वाल्मीक कराडचा सहकारी बाळा बांगर यांने मोठा खुलासा केला आहे. वाल्मीक कराडनेच महादेव मुंडे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शिला संपवलं असल्याचा दावा त्याने केला आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची देखील हत्या झाल्याचा खळबळजनक दावा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. वाल्मीक कराड आणि गोट्या गीते या दोघांनी टॉर्चर करून त्याला देखील संपवल्याचा दावा त्यांनी केला आहे. याआधी देखील बांगर यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा सहभागी असल्याचा दावा केला होता.

महादेव मुंडे यांना मारहाण करण्यात येत होती तेव्हा त्या ठिकाणी एक व्यक्ती उपस्थित होता. या प्रत्यक्षदर्शीला पोलिसांनी बोलून घेत त्याचा जबाब नोंदवून घेतला होता. त्यावेळेस त्यालाही टॉर्चर करून मारण्यात आलं, असा खळबळजनक दावा वाल्मीक कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी केला. बाळा बांगर यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे बीडमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.

महादेव मुंडे यांची २० महिन्यापूर्वी परळीत भरचौकामध्ये हत्या करण्यात आली होती. ज्यावेळेस महादेव मुंडे यांना मारण्यात आलं त्यावेळेस त्यावेळी घटनास्थळी जो प्रत्यक्षदर्शी व्यक्ती उपस्थित होता त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवला. पण जबाब नोंदवल्यानंतर त्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीला वेळोवेळी वाल्मीक कराड आणि गोट्या गीतेने टॉर्चर केलं. त्याला देखील संपवलं गेलं, असा खळबळजनक दावा विजयसिंह बांगर यांनी केला.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात जो समोर येईल त्याला संपवण्याचे काम वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने केले आहे, असा देखील आरोप विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला. दरम्यान, महादेव मुंडे यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १६ जुलैला विजयसिंग बांगर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह मुलाचा सहभाग असल्याचा दावा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

'सातपुडा'वरून अंजली दमानियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस | VIDEO

SCROLL FOR NEXT