santosh deshmukh brother Sakal
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: आम्ही त्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा संतोष देशमुखांच्या भावाला फोन; दोघांमध्ये काय चर्चा झाली?

Santosh Deshmukh Brother: वाल्मीक कराडच्या अटकेनंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुखांच्या भावाशी फोनवरुन संवाद साधला. या दोघांमध्ये काय चर्चा झाली जाणून घ्या.

Saam Tv

Santosh Deshmukh: बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी संशयित आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली आहे. तीन आरोपी अद्याप फरार आहेत. आज (३१ डिसेंबर) वाल्मीक कराडने पुणे पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

पुण्यात वाल्मीक कराडने पोलिसांसमोर सरेंडर केले. त्याने खंडणी प्रकरण पुढे करत शरणागती पत्करली. यानंतर राजकीय घटनांना वेग आला. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. 'जोपर्यंत सर्व आरोपी फासावर लटकत नाही, जोपर्यंत संतोष अण्णांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कुणीही असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हांला सांगितले", अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांना दिली.

धनजंय देशमुख यांनी वाल्मीक कराडच्या अटकेवरही प्रतिक्रिया दिली. 'सर्व आरोपींना अटक करा. हा जो सगळा प्रकार झाला यातल्या सगळ्या आरोपींना अटक करुन शिक्षा द्यावी', असे धनजंय यांनी म्हटले आहे. समाजातील विकृतींना कुठलीही जात नसते, त्यांना कुठलाही धर्म नसतो, विचार नसतात. माझं कुटुंब आणि माझं गाव यांना संरक्षण मिळायला हवं असे म्हणत त्यांनी संरक्षणाची मागणी केली.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी उर्वरित आरोपींना अटक न झाल्याच्या निषेधार्थ मस्साजोगमधील ग्रामस्थ उद्या जलसमाधी आंदोलन करणार आहेत. यावरही त्यांनी भाष्य केले. उद्या गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मी आज बाहेर होतो, माझ्यासोबत चर्चा झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी काय नियोजन केले याबाबतची माहिती माझ्याजवळ नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT