Jalindar Supekar  Saam Tv
महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane: IG सुपेकरांनी तुरुंगातील आरोपींकडे ३०० कोटी मागितले, भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप

Jalindar Supekar: वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेले आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. सुपेकरांनी तुरुंगातील आरोपींकडे ३०० कोटी मागितले, असा दावा धसांनी केला.

Priya More

योगेश काशिद, बीड

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे. सुपेकर जेलमधील आरोपींकडून ३०० कोटी रुपये मागितले, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. त्यांच्या आरोपीमुळे आता पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आयजी जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर जालिंदर सुपेकर यांची बदली करण्यात आली होती. जालिंदर सुपेकर यांची उपमहासमादेशक होमकार्ड पदी बदली करण्यात आली. या प्रकरणात सुपेकर यांचे नाव चर्चेत असतानाच आता त्यांच्याबाबत आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोपी केला आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

जालिंदर सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. यावेळी सुरेश धस यांनी हगवणे आणि सुपेकर यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात. त्यांच्यात नैतिकता नाही. आता दीडशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे? बाहेर आले तर यांना लोकं शेण हाणतील. काही लोकं टमाटे हाणतील. मात्र त्याने काही होणार नाही. ही लोकं बाहेर आल्यावर यांना कवटं मारली पाहिजे.'

दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणात चर्चेत असलेले विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची बदली झाली. त्यांना विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र या पदावरून काढण्यात आले. त्यांची बदली उपमहासमादेशक होमगार्ड या ठिकाणी करण्यात आली. त्यांची विशेष पोलिस महानिरीक्षक पदावरून पद अवनती झाली. त्यामुळे या प्रकरणामुळे जालिंदर सुपेकरांना मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC पक्ष कार्यालयात नेलं अन् विवस्त्र करून व्हिडिओ..भाजप महिला नेत्याचा गंभीर आरोप; परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

अबब! एक वर्षाच्या चिमुकल्याच्या चाव्यानं कोब्रा ठार; VIDEO

Thane News: ठाण्यातील कोपरी पूल ८ दिवस वाहतुकीसाठी बंद; सॅटिस प्रकल्पाच्या गर्डर बसविण्याचे काम सुरू|VIDEO

Shivani Rangole: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधल्या मास्तरीणबाईचं सौंदर्य पाहून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT