बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्याची संतप्त भावना निर्माण करणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमधून समोर आलीय. जुन्या वादातून रोहित पठारे नावाच्या तरुणाला चौकात नेऊन बेदम मारहाण करत अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, मारहाण सुरू असताना तरुणाने पाणी मागितल्यावर त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केलाय. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरून गेलाय.
दरम्यान पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आणि आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप रोहितच्या कुटुंबियांनी पालकमंत्री संजय शिरसाटांसमोरच केलाय. दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाटांनी याप्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर 10 आरोपींना अटक करण्यात आली. तर आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात काही संतप्त नागरिकांनी अचानक आरोपींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळला.
राज्यात ठिकठिकाणी दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी आणि अशा अमानुष घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलिसांच्या कर्त्याव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आणि फरार असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून आरोपींवर जरब बसेल आणि भविष्यात अशा विकृतींची पुनरावृत्ती होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.