MLA Vaibhav Naik , Narayan Rane, sindhudurg  saam tv
महाराष्ट्र

Narayan Rane News: नारायण राणेंच्या राजकीय निराेपासाठी आंगणेवाडीत भाजपचा आनंद मेळावा : वैभव नाईक

कणकवली येथे आमदार वैभव नाईक हे माध्यमांशी बाेलत हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Anganewadi : सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील आंगणेवाडीत नुकताच भाजपचा (BJP) आनंद मेळावा झाला. हा मेळावा नारायण राणेंना (Narayan Rane) राजकीय (politics) निरोप देण्यासाठी आयाेजिला हाेता अशी टीका आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी येथे केली. या मेळाव्यातून (anganewadi jatra 2023) भाविकांना फक्त मनस्ताप सहन करावा लागला असेही नाईक यांनी नमूद केले.

आमदार वैभव नाईक म्हणाले या मेळाव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही विकासाची घोषणा किंवा एकही नवा निधी दिला नाही. फक्त शिवसेना (shivsena) व उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) टीका इतकाच मेळाव्याचा अजेंडा हाेता की काय अशी टिप्पणी नाईक यांनी केली.

त्यामुळे हा मेळावा लाखो भाविकांना मनस्ताप देणारा ठरला असल्याची जोरदार टीका आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत (kankavali) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) हे संपूर्ण महाराष्ट्राचे आदराचे स्थान आहे. त्यांच्या विचारांवरच आम्ही काम करत आहोत. त्यामुळे छत्रपतींबाबत आव्हाड यांचे चुकीचे वक्तव्य असेल तर शिवसेनेचा त्याला विरोध असेल. जितेंद्र आव्हाडांच्या चुकीच्या वक्तव्याला आमचा विरोधच राहील असेही आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

आमदार नितीन देशमुख यांच्या धमकी प्रकरणावर आमदार वैभव नाईक म्हणाले मला ही अशा अनेक धमक्या निनावी फोन वरून आल्या. मात्र या धमक्या देणा-यांना कोणतीही हिमंत नाही.

नितीन देशमुख यांना ते माहीत नसल्यामुळे त्यांनी त्या धमकीची गांभीर्याने दखल घेतली. हे धमकी देणारे काहीही करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती. धमकी प्रकरणावरून वैभव नाईक (vaibhav naik) यांचा राणेंवर नाव न घेता प्रहार केला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : विजय वड्डेटीवार आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT