Chhatrapati Sambhajinagar Fire News Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Fire News : अरर...! वडापावच्या दुकानाला भीषण आग; दुकानदाराचे मोठे नुकसान

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून आगिची एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानाला मोठी आग लागली आहे. आगिची दाहकता इतकी मोठी होती की, संपूर्ण दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Fire News)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या गुलमंडी परिसरातील वडापावच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे ही आग (Fire) लागल्याचे समजले आहे. वडापावच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इलेक्ट्रिक मशीनमध्ये तेल गरम करत असताना अचानक शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे ही आग लागीने मोठा पेट घेतला. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागताच आजूबाजूच्या नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

आज मुलुंडमध्ये देखील धीरज अपार्टमेंटला तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली होती. मुलुंड स्टेशन परिसरातील सहा मजल्याची ही इमारत असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार ते सहा गाड्या आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे.

इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना देखील बाहेर काढण्यात यश आले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शॉर्टसर्किटमुळे आज दिवसभरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत.

गोडाऊनला आग; बिडी बनवण्यासाठीचा मेदु पत्ता, तंबाखु जळून खाक

जालना शहरापासून जवळ असलेल्या जमावाडी शिवारातील देऊळगाव (Jalna News) राजा रोडवर असलेल्या बिडी बनवणाऱ्या कारखान्याला रविवारी अचानक आग लागली. या आगीत बिडीसाठीचा मेदू पत्‍ता व तंबाखूचा साठा जळून खाक झाला होता.

जालना शहरालगत असलेल्‍या बिडी बनवण्यासाठी लागणारा मेदू पत्ता आणि तंबाखू ठेवण्यात आलेले गोलडाऊन आहे. या गोडाऊनला रविवारी सकाळी साडेआकाराच्या सुमारास अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. या आगीत मेदू पत्ता आणि तबाखू संपूर्णपणे जळून खाक झाल्याने व्यापाऱ्याचे मोठ नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT