Kolhapur Fire News Saam tv
महाराष्ट्र

Video: बापरे! महिलांकडून पूजा करताना वडाच्या झाडाला लागली आग; मंदिर परिसरातील यंत्रणेची एकच तारांबळ

कोल्हापुरात महिलांकडून पूजा करताना अचानक वडाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

Kolhapur: राज्यात सर्वत्र महिलांची वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी लगबग सुरू आहे. महिला वडाच्या झाडाची पूजा करताना दोरा गुंडाळत कापूर आणि उदबत्तीचा वापर करतात.मात्र, कोल्हापुरात पूजा करताना वडाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली.

कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंंदिरात महिलांकडून पूजा करताना अचानक वडाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली. यामुळे मंदिर परिसरातील महिलांची एकच तारांबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात वडाचं मोठं झाड आहे. आज वटपौर्णिनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी महिलांकडून पूजा सुरू असताना झाडाने अचानक पेट घेतला.

महिलांकडून पूजा करताना कापूर आणि उदबत्तीमुळे झाडाला बांधलेल्या दोऱ्याला आग लागली. वडाच्या झाडाला आग लागल्यानंतर मंदिर परिसरातील महिलांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर झाडाला लागलेली आग पाहताच मंदिर परिसरातील यंत्रणा सतर्क होत आग विझविण्यासाठी धावली.

या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक मशीनच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिर परिसरातील मोठा अनर्थ टळला.

विशाळगडाबाबत पुरातत्त्व विभागानं घेतला मोठा निर्णय

विशाळगडावरील (vishalgad) कायदा सुव्यवस्था आणि विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. या आदेशानूसार किल्ले विशाळगडावर पशु आणि पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

किल्ले विशाळगडावर (Vishalgad) मोठ्या प्रमाणात पर्यटकांकडून विशेषत: युवा वर्गाकडून दारु, तंबाखूजन्य पदार्थ अशा गोष्टींची विक्री आणि सेवन केले जात होते असे प्रकार समोर आले. या घटनांचा वाढता प्रमाण लक्षात घेता तसेच विशाळगडावर शिजविले जाणार मासं रोखण्यासाठी यासर्व गोष्टींना प्रतिबंध करण्याची मागणी कोल्हापुरात होत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Couples In Hotels: गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं एकत्र हॉटेलमध्ये राहणं गुन्हा आहे का?

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

SCROLL FOR NEXT