vaccination
vaccination 
महाराष्ट्र

'या' १२ दिवसांत लस घ्या अन् जिंका टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन

संजय तुमराम

चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर महापालिकेने लकी ड्राॅ योजना सुरु केली आहे. ही याेजना आजपासून (शुक्रवार, ता. १२) २४ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. या याेजनेत जे नागरिक लस घेतील त्यांना ड्रा च्या माध्यमातून फ्रीज, LED टीव्ही, वॉशिंग मशीनसह मिक्सर जिंकण्याची संधी प्राप्त हाेणार आहे. यासाठी महापालिकेने सर्व २१ लसीकरण केंद्रांवर लकी ड्रॉ बॉक्स ठेवले आहेत. ज्यामध्ये लसीकरण झाल्यावर नागरिक त्यांचे प्रमाणपत्र टाकणार आहेत. chandrapur muncipal corporation decleares lucky draw for covid 19 vaccination

चंद्रपूरात आतापर्यंत एक लाख ९३ हजार ५८१ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच ९९ हजार ६२० नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. शहरातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उभारली आहेत. शहरात २१ केंद्रांवर लसीकरण केले जाते. चंद्रपूर शहरातील सुमारे ४० हजार नागरिकांनी अद्याप लसीचा एकही डाेस घेतला नसल्याची माहिती समाेर आली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लकी ड्रॉ योजना आखली आहे.

दरम्यान फेरीवाले, अत्यावश्यक सेवा देणारे आणि दुकानदार यांनी किमान एक डोस घेतल्याचे लसीकरण प्रमाणपत्रे दाखवावे लागतील अन्यथा त्यांना शहरातील बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही अशी भुमिका प्रशासनाने घेतली आहे अशी माहिती चंद्रपूर महापालिकेचे सहआयुक्त विपीन मुद्दा यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

SCROLL FOR NEXT