accident  Saam Tv
महाराष्ट्र

उत्तरकाशीत जीप दरीत कोसळली; महाराष्ट्रातील 3 भाविकांचा मृत्यू,10 जखमी

अभिजीत घोरमारे

Uttarakhand Accident : उत्तरकाशीतून (Uttarkashi) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील भाविकांना घेऊन जाणारी बोलेरो जीप दरीत कोसळली आहे. या अपघातात तीन भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला, तर 10 भाविक जखमी झाले आहेत. गाडीतून 13 जण प्रवास करीत होते. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर (Yanunotri National Highway) गुरूवारी रात्री रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. (Uttarakhand Bolero Jeep Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील भाविक बोलेरो जीपने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बडकोटच्या दिशेने निघाले होते. त्याच दरम्यान वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला. जमुनोत्रीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना बोरेलो जीप दरीत कोसळली. गाडी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला, तर 10 भाविक जखमी झाले

पूरण नाथ (वय 40 वर्षे) मुंबई हल्ली मु अंधेरी, जयश्री अनिल कोसरे (वय 26 वर्षे) रा. तुमसर जिल्हा भंडारा आणि अशोक महादेव राव (वय 40 वर्षे) रा. नागपूर अशी मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची नावे आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन आणि एनडीआरएफ दल घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य पूर्ण केले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने 10 जखमींना खड्ड्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे

बाळकृष्ण कोसरे (वय ४१) रा. तुनसर जिल्हा भंडारा, अन्नूश्री अशोक (वय ०४) रा. नागपूर महाराष्ट्र, दिनेश (वय 35 वर्षे) रा तुमसर, जिल्हा भंडारा, मोनिका (वय 24 वर्षे) रा. तुमसर. जिल्हा भंडारा, कृषिता (वय 15 वर्षे) रा. भंडारा, रचना (वय 38 वर्षे) रा. भंडारा, बालकृष्ण जीटू (वय 41 वर्षे) रा. तुमसर. जिल्हा भंडारा, प्रमोद तुलसी राम (वय 52 वर्षे) महाराष्ट्र, प्रेरणा (वय 8 वर्षे) महाराष्ट्र. अशी जखमी झालेल्या भाविकांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: भारताऐवजी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला? विराट कोहलीने स्वतःच केला खुलासा

Voter List Fraud: व्होट चोरीचा आणखी एक पुरावा; बदलापूरमध्ये १७ हजार बाहेरील मतदार

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

SCROLL FOR NEXT